लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वेकोलिने २०१६ पासून माईनिंग सरदार व ओव्हरमॅन आदींसह अनेक रिक्त जागा भरल्या नाही़ त्यामुळे पात्र उमेदवारांवर अन्याय होत असल्याच्या निषेधार्थ शिवसना उपजिल्हा प्रमुख किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात नागपुरातील वेकोलि विभागीय कार्यालयासमोर गुरुवारी मोर्चा काढण्यात आला होता़ दरम्यान बेरोजगारांचा आक्रमक पवित्रा पाहून येत्या तीन महिन्यांत सर्व रिक्त जागा भरण्याचे आश्वासन विभागीय व्यवस्थापकानी दिले़ वेकोलिच्या शेकडो रिक्त जागा भरण्यात आल्या नाही. त्यामुळे या विभागातील माईनिंगमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत़ त्यांची वयोमर्यादा संपत असून नोकरीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. वेकोलिमध्ये नोकरी लागेल या आशेने शेकडो बेरोजगारांनी मायनिंग विषयाचे महागडे शिक्षण पूर्ण केले़पण वेकोलिने त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले असा आरोप शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर जोरगेवार यांनी केला आहे.अन्यथा पुन्हा आंदोलनवेकोलिच्या अनेक कोळसा खाणी सुरू असूनही रोजगार मिळत नाही़ जिल्ह्यातील काही खाणी बंद पडल्या आहेत. त्यामुळे युवकांच्या हाताला काम नाही़ हजारो रिक्त पदे भरण्यात आली नाहीत़ २०१६ पासून नोकर भरती बंद आहे़ त्यामुळे एका महिन्याच्या आत माईनिंग विभागातील रिक्त पदे भरावे़ आश्वासन पाळले नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे किशोर जोरगेवार यांनी दिला आहे़
वेकोलितील रिक्त जागा भरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 12:57 AM
वेकोलिने २०१६ पासून माईनिंग सरदार व ओव्हरमॅन आदींसह अनेक रिक्त जागा भरल्या नाही़ त्यामुळे पात्र उमेदवारांवर अन्याय होत असल्याच्या निषेधार्थ शिवसना उपजिल्हा प्रमुख किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात नागपुरातील वेकोलि विभागीय कार्यालयासमोर गुरुवारी मोर्चा काढण्यात आला होता़ ...........
ठळक मुद्देव्यवस्थापकांचे आश्वासन : शिवसेनेचा नागपुरात मोर्चा