ग्रामीण भागातील नागरिक हंगामी मजुरीसाठी शहराकडे धाव घेतात. हंगाम संपल्यानंतर ते गावाकडे परत येतात. त्यांना गृह विलगीकरण किंवा क्वारंटाइनसाठी पाहिजे त्या प्रमाणात त्याच्याकडे सोयी उपलब्ध राहत नाही. त्यामुळे कोरोना समितीची बैठक सरपंच विकास धारणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली. क्वारंटाईन सेंटर गावातच झाल्याने अडचणी निर्माण होणार नाही. मासळ बु. येथे राजीव गांधी विद्यालय क्वारंटाइनसाठी ग्रामपंचायतीने ताब्यात घेतले आहे. या क्वारंटाईन सेंटरची क्षमता २० लोकांची राहणार आहे. यावर ग्रामपंचायत कमिटी, आरोग्य विभाग व गावातील प्रतिष्ठित नागरिक लक्ष ठेवणार आहेत. तिथेच त्यांना पंधरा दिवस औषध उपचाराची सोय मिळणार आहे. कोविडचे सौम्य लक्षण असणाऱ्या रुग्णांना याचा फायदा होणार आहे. बैठकीला सरपंच विकास धारणे, उपसरपंच प्रमोद खापर्डे, ग्रामसेवक, प्रशांत लामगे ,तलाठी अमोल घाटे, ग्राम पंचायत सदस्य प्रा. वामन बांगडे, रंजना बन्सोड, ललिता बन्सोड, संजय धारणे, गायत्री खामनकर, मनीषा गराटे, अनिता नन्नावरे, तंटामुक्त समिती अध्यक्ष आशा जांभुळे, आरोग्य सेविका टोकलवार, आरोग्य सेवक सावसाकडे, अंगणवाडी सेविका शीला धारणे, शोभा गायकवाड, कुसुम धारणे, मदतनीस निशा पाटील, काजल राऊत, शशीकला वांढरे, आशा वर्कर वनिता गणवीर, शालू बारेकर, प्रतिष्ठित नागरिक तसेच युवक मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
अखेर ग्रामीण भागात क्वारंटाईन सेंटरसाठी शाळांचे अधिग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 4:36 AM