लोकमत न्यूज नेटवर्कघुग्घुस : अमराई वॉर्डातील एका बालकाच्या डोक्याचा दोन महिन्यांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयात एमआयआर झाला नव्हता. दरम्यान, लोकमत यासंदर्भात वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेऊन डॉ. अनिल माडुरवार यांनी मोफत एमआर व अन्य चाचण्या करून सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय दिला. सौरज रमेश ढोंगाले (६) या बालकाच्या डोक्याचा एमआयआर करणे गरजेचे होते. जिल्हा सामान्य रूग्णालयात वारंवार चकरा मारून एमआर झाला नव्हता. त्यामुळे कुटुंबीय हैराण झाले होते. ‘लोकमत’ ने याबाबत वृत्त प्रकाशित केल्यानंतर डॉ. माडूरवार यांनी एमआर करण्याची जबाबदारी स्वीकारली.रूग्णाच्या नातेवाईकाला मार्गदर्शन केले. डॉ. माडूरवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा सामान्य रुग्णालयाने प्रमाणित केलेले १. ५ टेस्ट पॉवर फुल एमआरआय सेंटर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात उपलब्ध आहे. बाल आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत तसेच नवजात शिशु अतिदक्षता विभागामार्फत रूग्णांना पाठविल्यास नि:शुल्क एमआरआय करता येऊ शकते, असेही डॉ. माडूरकर यांनी सांगितले.
अखेर ‘त्या’ बालकाचा मोफत एमआरआय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 10:50 PM