शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

अखेर ‘तो’ नरभक्षक बिबट जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 5:00 AM

नरभक्षक बिबटयाला ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या मेंडकी उपक्षेत्रातील नियतक्षेत्र चीचखेडा, डोर्ली गावाजवळ कक्ष क्रमांक १०१२  याठिकाणी गुंगीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्यात आले. सदर बिबटयाचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी ब्रम्हपुरी तालुक्यातील चीचगाव, डोर्ली, बरडकिन्ही, वांद्रा, आवळगाव आदी गावातील नागरिकांनी केली होती आणि यामुळे लवकरात लवकर नरभक्षक बिबटयाला जेरबंद करण्याचे मोठे आव्हान वनविभागासमोर उभे ठाकले होते. 

ठळक मुद्देदोन महिला व एका बालकाचा घेतला होता बळी : ग्रामस्थांनी सोडला निश्वास

  लोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी : ब्रम्हपुरी वनविभागाच्या उत्तर वनपरिक्षेत्रात गेल्या दोन महिन्यांपासून धुमाकूळ घालत दोन महिलांचा व एका बालकाचा बळी घेणाºया बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला शनिवारी सायंकाळी यश आले.या नरभक्षक बिबटयाला ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या मेंडकी उपक्षेत्रातील नियतक्षेत्र चीचखेडा, डोर्ली गावाजवळ कक्ष क्रमांक १०१२  याठिकाणी गुंगीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्यात आले. सदर बिबटयाचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी ब्रम्हपुरी तालुक्यातील चीचगाव, डोर्ली, बरडकिन्ही, वांद्रा, आवळगाव आदी गावातील नागरिकांनी केली होती आणि यामुळे लवकरात लवकर नरभक्षक बिबटयाला जेरबंद करण्याचे मोठे आव्हान वनविभागासमोर उभे ठाकले होते. या बिबट्याने आतापर्यंत चीचखेडा, डोर्ली परिसरात चांगलाच धुमाकूळ घातला होता. आतापर्यंत दोन महिला आणि एका बालकाला या बिबट्याने ठार केले होते. त्यानंतर हा बिबट याच परिसरात फिरत होता. त्यामुळे नागरिक भयभीत झाले होते. बिबट्याच्या दहशतीमुळे शेतीच्या कामावरही परिणाम होत होता. या बिबट्याला जेरबंद करावे, अशी ओरड नागरिक करीत होते. तेव्हापासून वनविभागाचे अधिकारी रात्रंदिवस या परिसरात गस्त घालत होते. दरम्यान, शनिवारी सायंकाळी या बिबट्याला डोर्ली गावाजवळ कक्ष क्रमांक १०१२ बेशुध्द करून पिंजºयात जेरबंद करण्यात आले. यावेळी वनाधिकारी रामेश्वरी बोंगाळे, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत एस. खोब्रागडे व  वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते. 

३ डिसेंबरपासून वनविभाग होता गस्तीवरयानुसार वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी ३ डिसेंबरपासून  बिबटयाला जेरबंद करण्यासाठी परिसरात गस्त घालत होते. ७ डिसेंबरपासून रॅपिड रिस्पॉन्स टीम चंद्रपूर, एसटीपीएफ चिमूर, एसटीपीएफ मूल हे दिवसरात्र सदर बिबट्याचा शोध घेत गावासभोवताल फिरत होते. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी नरभक्षक बिबट्याला ४८ तासात जेरबंद करण्याचे आदेश दिले होते.  

टॅग्स :leopardबिबट्याforest departmentवनविभाग