शहरं
Join us  
Trending Stories
1
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
2
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
3
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
4
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
5
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
6
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
7
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ
8
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
9
अदानी मुद्द्यावर 'इंडिया आघाडीत' फूट? टीएमसीने काँग्रेसला फटकारले
10
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
11
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
12
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट
13
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
14
PPF ची जादू : ₹१.७४ कोटी व्याजातून कमावाल; मॅच्युरिटीवर मिळतील ₹२.२६ कोटी, पाहा सोपा फॉर्म्युला
15
Honda ACTIVA e चे बुकिंग कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या स्कूटरची रेंज आणि फीचर्स...
16
अखेर विकी कौशलच्या 'छावा'ची रिलीज डेट जाहीर! २०२५ मध्ये या खास दिवशी रिलीज होणार सिनेमा
17
नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक
18
"तू जितका शिकून आलास..."; पत्नीच्या उपचारासाठी आलेले IPS डॉक्टरवर संतापले, दिली धमकी
19
Finally Divorced... ऐश्वर्या आणि धनुष यांच्या घटस्फोटाला 2 वर्षानंतर कोर्टाकडून मान्यता
20
खांदे पालट झाल्यावरही श्रेयस-अजिंक्य यांच्यात गोडी; पुणेकर ऋतुराज-राहुलवर भारी पडली मुंबईकर जोडी

अखेर ‘रिलायन्स जीओ’ला परवानगी

By admin | Published: June 28, 2014 2:26 AM

‘रिलायन्स जीओ इन्फोकॉम’च्या ४ जी केबलचे जाळे महानगरात पसरवण्यासाठी ३५ किलोमीटरचे खोदकाम करण्याची परवानगी अखेर मनपा प्रशासनाने दिली आहे.

चंद्रपूर : ‘रिलायन्स जीओ इन्फोकॉम’च्या ४ जी केबलचे जाळे महानगरात पसरवण्यासाठी ३५ किलोमीटरचे खोदकाम करण्याची परवानगी अखेर मनपा प्रशासनाने दिली आहे. खोदकाम शुल्का व्यतिरिक्त रिलायन्स जीओ कंपनी मनपाला बोनस स्वरूपात काही कामे करून देणार असून यासाठी जवळपास अडीच कोटी रुपये अतिरिक्त खर्च करणार आहे. कोणत्या उद्देशाने रिलायन्स जिओ हा अतिरिक्त खर्च करणार आहे, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. याप्रकरणातील मनपातील पदाधिकारी आणि नगरसेवकही चुप्पी साधून असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे, शहरातील रस्त्यांची कामे सुरू करण्यात आल्यानंतर आता पुन्हा रिलायन्स जिओसाठी खोदकाम केले जाणार असल्याने नागरिकांची डोकेदुखी दुपटीने वाढणार आहे. चंद्रपूर शहरात जवळपास १३५ किलोमीटरचे रस्ते आहेत. यापैकी फक्त ३५ किलोमीटर रस्त्याचे खोदकाम करून रिलायन्स जीओ इन्फोकॉम कंपनीने आपले ४ जीचे केबल टाकणार असल्याचा दावा केला आहे. ३५ किलोमीटरच्या खोदकामासाठी रिलायन्स जीओ कंपनी महानगरपालिकेला साडेतीन कोटी रुपये शुल्क भरणार आहे. रिलायन्स जीओच्या खोदकामाला परवानगी देण्यात येऊ नये म्हणून गेल्या वर्षी काही नगरसेवकांनी बराच गदारोळ केला होता. काही पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी आणि एका अभियंत्यावर रिलायन्स जीओकडून पैसे घेतल्याचा आरोपसुद्धा झाला होता. प्रचंड वादळ उठल्याने रिलायन्सच्या खोदकाम परवानगीचा विषय नंतर टांगून ठेवण्यात आला होता. तत्कालीन आयुक्त प्रकाश बोखड यांनी सेवानिवृत्तीच्या काळात वादग्रस्त विषयाला हात लावला नाही. मात्र रिलायन्स जीओच्या खोदकामाला परवानगी देण्यात यावी, यासाठी काही पदाधिकारी आणि अधिकारी सुरुवातीपासूनच इच्छुक होते.हा केंद्र सरकारचा उपक्रम असल्याने रिलायन्स जीओ इन्फोकॉमच्या ४ जी केबल खोदकामासाठी केव्हातरी परवानगी द्यावीच लागणार होती. शहराच्या इतर भागात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वेकोलि प्रसासनाने या खोदकामासाठी परवानगी दिली होती. मात्र, महानगरपालिका प्रशासनाने काही अटींवर खोदकामाची परवानगी रोखून धरली होती. वास्ताविक शहरातील दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या कामाला सुरूवातही याच काळात केली जाणे जवळजवळ निश्चित होते. त्यामुळे या कामाआधीच रिलायन्स जिओला खोदकामाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी काही नगरसेवकांनी लावून धरली होती. मात्र त्याकडे लक्ष देण्यात आले नाही. आत रस्त्यांची कामे सुरू आहेत. बहुतांश रस्त्यांवर पहिला कोट चढलाही आहे. अशातच आता गेल्या महिन्यात झालेल्या मनपाच्या आमसभेत रिलायन्स जीओच्या खोदकामाला परवानगी देण्याचा विषय बहुमताने मंजूर करण्यात आला. या कंपनीने खोदकाम शुल्काव्यतिरिक्त चंद्रपूर शहरातील एकमेव ऐतिहासिक गार्डन मौलाना अबुल कलाम आझादचे सौंदर्यीकरण करून देण्याची हमी दिली. या सौंदर्यीकरणाच्या खर्चासाठी जवळपास दीड कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. खर्चाचा आराखडाही तयार आहे. या व्यतिरिक्त साार्वजनिक शौचालयसुद्धा बांधून देणार आहे. तसेच ही कंपनी शहरात १०० टॉवर उभे करणार असून त्याचे शुल्कसुद्धा मोजण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे खोदकामाला परवानगी दिल्याचा युक्तिवाद महानगरपालिका पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे. रिलायन्स जीओने ३५ किलोमीटरच्या खोदकामाची परवानगी मागितली असली तरी प्रत्यक्षात तीनपट खोदकाम केले जाणार असल्याची माहिती आहे. विनापरवानगीने होणाऱ्या कामातून आठ कोटी रुपये शुल्क वाचणार असून त्यातून आझाद बगिचाचे सौंदर्यीकरण, सार्वजनिक शौचालय निर्माण केले जाणार आहेत. अन्यथा रिलायन्स जीओला खोदकाम शुल्काव्यतिरिक्त इतका पैसा खर्च करण्याची गरजच काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (शहर प्रतिनिधी)