शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
2
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
3
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
5
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
6
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
7
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
8
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
9
TATA IPL Auction 2025 Live: डेव्हिड वॉर्नर पुन्हा अनसोल्ड; हैदराबादला २०१६ मध्ये बनवलं होतं चॅम्पियन
10
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
11
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
12
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
13
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
14
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
16
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
17
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
18
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
19
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम

अखेर पावसाची उसंत; धान रोवणीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 12:36 AM

जुलैच्या शेवटच्या आठवडयापर्यंत निसर्गाच्या लहरीपणाचा फटका खरीप हंगामाला बसला. शेतकऱ्यांना जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पावसाची प्रतीक्षा करावी लागली होती. मात्र गेल्या २९ जुलैपासून पावसाने दमदार हजेरी लावली. सततच्या पावसानंतर आज शुक्रवारी पावसाने उसंत घेतली.

ठळक मुद्देमजुरांची ने-आण शेतकऱ्यांवरच : मजुरांची मजुरी व गुत्त्याचे भाव वधारले

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : जुलैच्या शेवटच्या आठवडयापर्यंत निसर्गाच्या लहरीपणाचा फटका खरीप हंगामाला बसला. शेतकऱ्यांना जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पावसाची प्रतीक्षा करावी लागली होती. मात्र गेल्या २९ जुलैपासून पावसाने दमदार हजेरी लावली. सततच्या पावसानंतर आज शुक्रवारी पावसाने उसंत घेतली. त्यामुळे ग्रामीण भागात रोवणीच्या कामाला गती प्राप्त झाली असून सर्वत्र एकाचवेळी रोवणी सुरु झाल्याने शेतकºयांची मजुरांसाठी धावाधाव सुरु आहे. मजुरांचा तुटवडा जाणवत असल्याने मजुरीच्या दरात वाढ झाली आहे. तसेच गुत्त्याच्या भावातसुद्धा काही प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचबरोबर रोवणीला बाहेरून मजूर आणावे लागत असल्याने मजुरी सोबतच ने-आण करण्याचे भाडेही मोजावे लागत आहे.जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत दडी मारलेल्या पावसाने गत १५ दिवसांपासून दमदार हजेरी लावल्याने सर्वत्र पाणी जमा झाले. आता रोवणीची कामे सुरू असून तालुक्यात १५० ते २५० रुपये मजुरी झाली असून एकरानुसार घेतल्या जाणाºया गुत्त्याच्या भावात २००-३०० रुपयांची वाढ झाली आहे. ब्रम्हपुरी तालुक्यात २७ हजार ८४८ हेक्टर धानाचे क्षेत्र असून ११ हजार २४६ हेक्टर शेतजमिनीवर आवत्या धानाची पेरणी करण्यात आली आहे. जुलैपर्यंत फक्त २५ टक्के रोवणी झाली होती. आतापर्यंत तीन हजार ८३८ हेक्टर शेतजमिनीवरील रोवणी आटोपली आहे तर १२७७ हेक्टर जमिनीवरील धानाचे पºहे शिल्लक असून समाधानकारक झालेल्या पावसामुळे रोवणीअंतिम टप्प्यात आली आहे.दरवर्षी होत असलेल्या बेशुमार वृक्षतोडीमुळे, वाढत्या प्रदूषणामुळे पर्जन्यावर विपरित परिणाम झाल्याने रोहिणी, मृग, आद्रा नक्षत्र कोरडे गेले. काही शेतकऱ्यांनी पऱ्हे वाचविण्यासाठी टँकरने पाणी टाकून पºहे जगविले होते. काही काळ दडी मारलेल्या पावसामूळे शेतकरी चिंतातुर झाला होता. यावर्षी कोरडा दुष्काळ तर पडणार नाही, या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासले होते. परंतु उशिरा का होईना गत पंधरवडयापासून पावसाची संततधार तसेच अधूनमधून रिमझिम पाऊस बरसत असल्याने धान उत्पादक शेतकºयांना दिलासा मिळाला. तालुक्यात सरासरी १२०० मिमी पाऊस होत असतो. ९ आॅगस्टच्या नोंदीनुसार ब्रम्हपुरी तालुक्यात आतापर्यंत ५९६.५ मिमी पाऊस झाला आहे. यावर्षी लांबलेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी मध्यम व हलक्या प्रतिच्या वाणाच्या धानाची निवड केली आहे. तालुक्यातील अनेक तलावात समाधानकारक जलसाठा झाला असून नदी-नाल्यांनाही पाणी वाढल्याने रोवणीसाठी शेतकºयांना सिंचनाची सोया उपलब्ध झाली आहे. त्यामुळे रोवणी, पेरणी, खते टाकणे या कामांना वेग आला आहे.आठ घरांची पडझडसिंदेवाही : मागील १५ दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे अनेकांचे नुकसान झाले असून शहरातील प्रभाग क्र. १३ व प्रभाग क्र. १६ मधील आठ घरांची पडझड झाली आहे. त्यामुळे शासनाने त्वरित पंचनामा करुन आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. तसेच शहरातील रस्त्याची दैनावस्था झाली आहे. पायदळसुद्धा चालू शकत नाही. नगरपंचायत त्वरित लक्ष देऊन समस्या सोडवावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती