शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

अखेर चौकशी समितीने घेतले कर्मचाऱ्यांचे बयाण

By admin | Published: June 09, 2016 12:41 AM

तालुक्यातील पहेला प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कर्मचाऱ्यांचे बयाण गोपनियता भंग प्रकरण ‘लोकमत’ने उघडकीस आणले.

दखल लोकमतची: प्रकरण बयाण गोपनियता भंगचे, अहवालाची प्रतीक्षा भंडारा : तालुक्यातील पहेला प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कर्मचाऱ्यांचे बयाण गोपनियता भंग प्रकरण ‘लोकमत’ने उघडकीस आणले. या प्रकरणाच्या वृत्तांची दखल घेत चौकशी समितीने सोमवारी पहेला केंद्र गाठून पाच कर्मचाऱ्यांचे बयाण घेतले. उर्वरीत ३ कर्मचाऱ्यांचे बयाण लवकरच घेतले जाणार आहे. त्यानंतर दोन-तीन दिवसात अहवाल तयार करून आरोग्य समितीसमोर ठेवण्यात येणार आहे. या अहवालाकडे आता अनेकांचे लक्ष लागले आहे. (नगर प्रतिनिधी)चौकशी समितीचा चार तास ठिय्याअहवालाची प्रतीक्षा : प्रकरण बयाण गोपनियता भंगचेभंडारा : पहेला प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत येणाऱ्या दवडीपार उपकेंद्रात २२ डिसेंबर २०१५ ला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भेटी दरम्यान कपाटात व टेबलावर अस्ताव्यस्त स्थितीत लसी आढळून आले होते. ती लस चुकुन बालकांना दिल्या गेली असती तर जीवितहानी झाली असती. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांंनी वरिष्ठांकडे तशी माहिती सादर केली होती. त्यानंतर आरोग्य विभागाच्या दोन अधिकाऱ्यांनी कार्यरत १० कर्मचाऱ्यांचे बयान नोंदविले होते. नोंदविलेले बयान गोपणीय ठेवले जातात. मात्र हे गोपणीय बयान सार्वजनिक झाले. याची मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले. चौकशी समितीत दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विजय डोईफोडे यांनी पहेला प्राथमिक आरोग्य केंद्र गाठून संबधितांचे बयाण रेकॉर्डिग केले. एकाच प्रकरणाचे तीनदा बयान नोंदविण्यात आले आहे.पहेला आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचे गोपनीय बयान सार्वजनिक झाल्यासंबधीचे वृत्त २१ एप्रिल रोजी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाले. या प्रकरणात आरोग्य सहाय्यिकेचे स्थानांतरण करण्यात आले. मात्र अद्यापही ज्या अधिकाऱ्यांकरवी बयाण गोपनियता भंगाची कारवाई व्हायला हवी ते पडद्याआड आहेत. त्यांना अधिकाऱ्यांकडून पाठबळ मिळत असल्याची चर्चा आहे. ‘लोकमत’च्या पाठपुराव्यानंतर या प्रकरणाविषयी जिल्हा आरोग्य समितीने पाच सदस्यीय चौकशी समिती गठित केली होती. जिल्हा परिषद आरोग्य समितीचे सदस्य प्रदीप बुराडे यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांची चमू १० मे रोजी पहेला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल होणार होती. मात्र काही कारणांमुळे चौकशी समिती पहेला येथे पोहचली नाही. त्यानंतर या प्रकरणाविषयी चर्चेला पेव फुटले होते. त्यानंतर ६ जून रोजी दुपारी १२ वाजता चौकशी समितीचे अध्यक्ष प्रदीप बुराडे, सदस्य चंद्रप्रकाश दुरुगकर, चंदूलाल पिल्लारे, खंडविकास अधिकारी मंजुषा ठवकर, तालुका आरोग्य अधिकारी अनुराधा जुगनाके पहेला आरोग्य केंद्रात धडकले. प्रकरणासंबधीत उपस्थित पाच कर्मचाऱ्यांचे लेखी बयान घेतले. दोन तक्रारकर्ते कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण व एक कर्मचारी सभेला गेल्यामुळे त्यांचे बयान घेण्यात आले नाही. त्या कर्मचाऱ्यांचे बयान लवकरच घेण्यात येणार असल्याचे समितीने स्पष्ट केले. त्यांचे बयान घेतल्यानंतर दोन-तीन दिवसात चौकशी समिती अहवाल तयार करणार आहे. चौकशीचा अहवाल सर्वसाधारण सभेपुर्वी जिल्हा आरोग्य समितीच्या बैठकीत सादर करणार आहेत. (नगर प्रतिनिधी)