लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील कंत्राटी कामगारांना परत कामावर घेण्यासंदर्भात प्रहारच्या नेतृत्वात जटपुरा गेटवर बेमुदत उपोषण सुरू होते. २३ दिवसांच्या लढ्यानंतर कामगारांना न्याय मिळाला आहे. १५ जानेवारीपासून कामावर घेण्याचा निर्णय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने घेतला आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मध्यस्थीमुळे हा प्रश्न आता सुटला आहे. आ. नाना श्यामकुळे यांनी या संदर्भातील एक पत्र आमरण उपोषणाला बसलेल्या पप्पु देशमुख यांंना दिले व लिंबू पाणी पाजून उपोषणाची सांगता केली.काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागाने दुबार सेवा असलेल्या कामगारांना अनुदान मिळणार नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे कंत्राटी कामगारांवर बेरोजगार होण्याची पाळी आली. प्रहारच्या नेतृत्वात या अन्यायाविरोधात कामगारांनी लढा सुरू केला. एकूण १३७ कामगारांना पुर्ववत कामावर घेण्याची मागणी प्रहारने जिल्हाध्यक्ष पप्पु देशमुख यांच्या नेतृत्वात लावून धरली. १ जानेवारीपासून कामगारांनी साखळी उपोषण सुरू केले. या आंदोलनाची दखल न घेतल्या पप्पु देशमुख यांनी ८ जानेवारीपासून आमरण उपोषणाला सुरूवात केली. विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संबंधित विभागाशी बैठक घेतली व यावर तोडगा काढण्याचे निर्देश दिले.
अखेर ‘त्या’ कंत्राटी कामगारांना मिळाला न्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 12:21 AM
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील कंत्राटी कामगारांना परत कामावर घेण्यासंदर्भात प्रहारच्या नेतृत्वात जटपुरा गेटवर बेमुदत उपोषण सुरू होते. २३ दिवसांच्या लढ्यानंतर कामगारांना न्याय मिळाला आहे. १५ जानेवारीपासून कामावर घेण्याचा निर्णय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने घेतला आहे.
ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या मध्यस्थीने तोडगा