लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) दरात मोठे फेरबदल करीत केंद्र सरकारने व्यापारी तसेच सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा दिला. मुंबई व विदर्भातील काही व्यापारी संघटनांनी अनेक उत्पादनांचे दर कमी करण्यासाठी राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मागणी केली होती. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्र सरकारकडे तसेच जीएसटी परिषदेत पाठपुरावा केल्याने नुकतेच काही वस्तूंचे दर कमी करण्यात आले.१३ नोव्हेंबर रोजी व्यापारी बांधवांच्या शिष्टमंडळाने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत करीत आभार मानले. यावेळी आमदार राज पुरोहित, आमदार मंगलप्रभात लोढा, माजी आमदार अतुल शाह उपस्थित होते.तर व्यापाºयांच्या शिष्टमंडळात फॅम संघटनेचे अध्यक्ष विनेश मेहता, उपाध्यक्ष जितेंद्र शहा, रसिक कोठारी, महासचिव आशिष मेहता, सचिव प्रितेश शहा यांच्यासह बँगल मर्चंट असोसिएशनचे रमेशभाई, टिम्बर प्लायवूड मर्चंट असोसिएशन, बॉम्बे टिम्बर मर्चंट असोसिएशन, रेफ्रिजरेशन संघटनेचे राटा, मेटल असोसिएशनचे मासमा आदींची उपस्थिती होती.
व्यापाºयांनी मानले वित्तमंत्र्यांचे आभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 10:46 PM
वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) दरात मोठे फेरबदल करीत केंद्र सरकारने व्यापारी तसेच सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा दिला.
ठळक मुद्देजीएसटी : काही वस्तूंचे दर कमी केल्याबाबत मानले आभार