लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेतीसाठी घेतलेल्या कर्जाचे पुनर्गठन करण्यासोबतच संपूर्ण कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी कर्ज मिळण्यास अडचणी येत आहेत. तर दुसरीकडे जुन्या कर्जाचे पुनर्गठन करण्याची मुदत ३१ ऑक्टोबरला संपली. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. मात्र, बँकांनी थकित कर्ज वसुलीचा तगादा सुरूच ठेवल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.खरीप व रब्बी हंगामात कृषी कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जिल्ह्यात लक्षणीय आहे. सन २०१९-२० या वर्षात पंधराही तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी कृ षी कर्ज घेतले. नापिकीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांवर २०१९ पूर्वीचे कर्ज थकित आहे. या कर्जाचे पुनर्गठन करून कर्जाचा भरणा केल्यानंतर दरवर्षी दोन्ही हंगामात शेतकऱ्यांना नवीन कर्ज दिल्या जाते. कर्ज पुनर्गठन करण्यासाठी शेतकऱ्यांना बँकांमध्ये संबंधित कागदपत्रे सादर करावी लागतात. गतवर्षीपासून ही कागदपत्रे ऑनलाईन सादर करण्याचा नियम लागू करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. ग्रामीण भागात इंटरनेट व विजेची समस्या असल्याने शेतकऱ्यांना तालुकास्थळी चकरा माराव्या लागल्या.परिणामी, खरीप हंगामादरम्यान शेतकरी त्रस्त झाले होते. जुन्या कर्जाचे पुनर्गठन झाले नाही तर नवीन कृषी कर्ज मिळण्याचे सर्वच मार्ग बंद होतात. या धास्तीने शेतकऱ्यांनी मोठे दिव्य पार करून ऑनलाईन कागदपत्रे अपलोड केली. दरम्यान, शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या. परंतु, हजारो शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला नाही. खरीप हंगामातील पिके आता हाती येण्याच्या स्थितीत असताना परतीच्या पावसाने प्रचंड नुकसान केले. त्यामुळे रब्बी हंगामाकरिता कृषी कर्ज मिळेल, या आशेने शेतकरी बँकांचे उंबरठे झिजवत आहे. पण, ३१ ऑक्टोबरला संपल्याने नवीन कर्ज मिळण्याचे मार्ग बंद झाले आहेत. परतीच्या पावसाने खरीप पिकांचे नुकसान केले. त्यामुळे शेतकरी हतबल झाल्याने हा प्रश्न सोडविण्याची मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.मुदत वाढवावीखरीप हंगामातील पिकांना जोरदार फटका बसूनही दिवस पालटतील या आशेने शेतकरी रब्बी हंगामाच्या तयारीला लागला आहे. शेकडो शेतकरी कृषी कर्जासाठी कागदपत्रांची जुळवाजुळवा करत आहेत. नवीन शेतकऱ्यांना कर्ज मिळण्याची आशा आहे. मात्र, थकबाकीदार शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन न झाल्याने समस्या निर्माण झाली. त्यामुळे पुनर्गठनाची मुदत वाढविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.
कर्जाच्या पुनर्गठनाअभावी आर्थिक कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2019 6:00 AM
खरीप व रब्बी हंगामात कृषी कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जिल्ह्यात लक्षणीय आहे. सन २०१९-२० या वर्षात पंधराही तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी कृ षी कर्ज घेतले. नापिकीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांवर २०१९ पूर्वीचे कर्ज थकित आहे. या कर्जाचे पुनर्गठन करून कर्जाचा भरणा केल्यानंतर दरवर्षी दोन्ही हंगामात शेतकऱ्यांना नवीन कर्ज दिल्या जाते.
ठळक मुद्देबँकांकडून वसुलीचा तगादा : पुनर्गठनाची मुदत संपली, रबीसाठी कर्ज मिळण्यास अडचणी