शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भाजपाला आणखी एक धक्का बसणार, माजी खासदार तुतारी फुंकणार? 
2
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
3
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
4
Ratan Tata News LIVE: ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा पंचत्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
5
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
6
केंद्र सरकारची कारवाई; 'हिज्ब-उत-तहरीर' दहशतवादी संघटनेवर घातली बंदी
7
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
8
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
9
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
10
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
11
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
12
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
13
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...
14
PAK vs ENG: धो डाला! पाकिस्तानच्या सहा गोलंदाजांची बॉलिंगमध्ये 'शतकं', एक पोहोचला 'द्विशतका'जवळ
15
मंत्रिमंडळाची आज शेवटची बैठक संपन्न; पुढील ३-४ दिवसांत राज्यात आचारसंहिता लागू?
16
महिला आमदाराच्या पतीला केलं 'इमोशनल ब्लॅकमेलिंग', २५ हजारांची झाली फसवणूक
17
PAK vs ENG : ५५६ धावा तरी सामन्याचा 'रुट' बदलला; इंग्लंडने पाकिस्तानची 'घरच्यांसमोर' लाज काढली
18
"या नेत्यांमुळे काँग्रेस हरयाणात हरली’’, पराभवाचं खापर फोडत संतप्त राहुल गांधींनी मांडलं परखड मत 
19
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत...TATA च्या उत्पादनाशिवाय तुमचे पानही हलत नाही
20
उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली?; रविकांत तुपकरांनी सांगितली रणनीती

अनाथ-निराधार मुलींना आर्थिक मदत

By admin | Published: September 14, 2016 12:45 AM

स्थानिक विवेकानंद महाविद्यालयात भद्रावती येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व रोटरी क्लब आफ भद्रावती यांचे ...

‘लेक वाचवा’ अभियान : आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनभद्रावती : स्थानिक विवेकानंद महाविद्यालयात भद्रावती येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व रोटरी क्लब आफ भद्रावती यांचे संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचे औचित्य साधून ‘लेक वाचवा’ या अभियानांतर्गत अनाथ व निराधार मुलींना आर्थिक मदत देण्याचा संकल्प कार्यक्रम आयोजित केला होता.या आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष म्हणून माजी विधानसभा उपाध्यक्ष अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे तर प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष डॉ.रजनीताई हजारे, तालुका काँग्रेस अध्यक्ष सुभान सौदागर, रोटरी क्लब आॅफ भद्रावतीचे अध्यक्ष अविनाश सिद्धमशेट्टीवार, सचिव प्रा. विनोद घोडे, जाकीरभाई, परवेज सौदागर, विशाल बोरकर, अमोल नक्षिणे, ग्राहक पंचायत अध्यक्ष पुरुषोत्तम मत्ते, रमेश खातखेडे, प्राचार्य डॉ.एन.जी. उमाटे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. उमाटे यांनी केले. डॉ. रजनीताई हजारे म्हणाल्या की, विवेकानंद महाविद्यालयाने आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनप्रसंगी एका स्तुत्य उपक्रमाला सुरुवात केली. ही आनंदाची बाब आहे. समाज साक्षर होऊन, अनाथ मुली होणार नाही, निराधार राहणार नाही, स्त्रीला जगण्याचा हक्क मिळावा, निसर्गातील कळीचे फुुलात रूपांतर व्हावे. त्याप्रमाणे मुलीला फुलू उमलू द्या. या न्यायाने त्या मुलींना आर्थिक मदत देवून आपला वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प केला आहे. याबाबत मला आनंद वाटत आहे. अशा प्रकारे लेकी वाचवण्यासाठी अनेक लोकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष अ‍ॅड. मोरेश्वरराव टेमुर्डे म्हणाले की, ‘लेक वाचवा’ या न्यायाने समाजाने मुलीकडे पाहायला पाहिजे. स्त्री ही माता आहे. ती समाजाची उद्धारकर्ती आहे. म्हणून मातेला समाजात, कुटुंबात आद्यस्थान मिळाले आहे. आजच्या तरुणांनी स्त्री ही माता, बहीण समजून मदत तसेच सेवा करावी. त्याचबरोबर समाजातील दानशूर लोकांनी एकत्र येवून अशा अनाथ व निराधार मुलींना मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी अध्यक्षीय भाषणातून सांगितले.कार्यक्रमाचे संचालन डॉ.जे.पी. राखुंडे तर आभारप्रदर्शन डॉ.यू.सी. घोसरे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)दोन विद्यार्थिनींच्या नावे मुदतठेवआंतरराष्ट्रीय साक्षरता दिन कार्यक्रमाप्रसंगी प्रा. विनोद घोडे व विशाल बोरकर यांनी एकूण १० हजार रुपये सदर मुलींना देण्याचे निश्चित केले. परवेज सौदागर यांनी शारदा भोंगे व सलोनी ढोक या विद्यार्थिनींना प्रत्येकी सहा हजार रुपये असे एकूण १२ हजार रुपये त्यांच्या नावे १० वर्षांंसाठी फिक्स डिपाजिट करून मुदतठेव प्रमाणपत्र देण्यात आले.