कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्य शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंध लादले आहेत. त्याच्या अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायत प्रशासनाने कंबर कसली आहे. बालाजी रेडिमेडचे मालक अश्विन नंदनवार यांनी दुकानातील सामान घरी नेऊन दुकान थाटले होते. त्यामुळे ग्राहक खरेदीकरिता गेल्याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाला मिळताच त्यांनी गुरुवारी धाड टाकली. परंतु त्या दिवशी त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही न करता समज देण्यात आली. शुक्रवारी पुन्हा ग्राहक खरेदी करीत असल्याची माहिती मिळताच पुन्हा धाड टाकण्यात आली. त्यामुळे त्यांच्यावर १५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई उपसरपंच अशोक चौधरी, सदस्य मस्जिद शेख, संजय ननावरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद जांभळे, पोलीस कर्मचारी नागरगोचे, माजी ग्रा. पं. सदस्य पिंटू शेरकी, गोकुल सावरकर, ग्रा. पं. कर्मचारी संतोष कोरडे, सादिक शेख आदींनी केली.
शंकरपूर येथे कापड दुकानावर १५ हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 4:27 AM