चंद्रपूर: जगातील पहिली बांबूने निर्मिलेली इमारत असे जिचे वर्णन होणार होते, त्या बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रात गुरुवारी दुपारी अचानक आग लागली. मूल मार्गावर २० कि.मी. अंतरावर हे प्रशिक्षण केंद्र आहे. गुरुवारी दुपारी अचानक त्यातील एका भागातून आगीच्या ज्वाळा निघू लागल्या. ही आग कशाने लागली याचे कारण अद्यापी स्पष्ट झालेले नाही. ही संपूर्ण वास्तू बांबूने बांधण्यात आली आहे.
या ठिकाणी बांबू उद्योगासाठी पूरक अशा प्रशिक्षणाचा उपक्रम राबविला जाणार आहे. तसेच बांबूने तयार केलेल्या वस्तूंची विक्रीही केली जाणार आहे. या केंद्राला माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हिरवी झेंडी दाखविली होती.