लोकमत न्यूज नेटवर्कमूल : येथील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वनवसाहतीतील एका सदनिकेला आग लागल्याने महत्त्वाच्या दस्ताऐवजासह डिझेल व टायर जळून खाक झाल्याची घटना बुधवारी रात्री अडीच वाजताच्या सुमारास घडली. घटनास्थळाला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपवनसंरक्षक नरवणे यांनी भेट देवून पाहणी केली. आग कोणी लावली की घातपात आहे, याबाबत शंकाकुशंका व्यक्त केल्या जात आहेत.वनकर्मचाºयांना जंगलाचे रक्षण करणे सोपे जावे यासाठी मूल येथील वनविभागाच्या कार्यालय परिसरात कर्मचाºयांसाठी वनवसाहत उभारण्यात आली आहे. सध्या या वसाहतीतील अनेक निवासस्थाने पडक्या स्थितीत आहे. यातील एका निवासस्थानामध्ये वनविभागातील महत्त्वाचे जुने दस्ताऐवज ठेवण्यात आले होते. यासोबतच काही वनगुन्ह्यातील महत्त्वाचे जुने दस्ताऐवज व साहित्य होते. ते संपुर्ण दस्ताऐवज बुधवारी लागलेल्या आगीत जळून खाक झाले.ही बाब वनवसाहतीत राहणारे वनरक्षक म्हस्के आणि सिडाम यांच्या लक्षात येताच त्यांनी वनपरिक्षेत्राधिकारी बोबडे यांना माहिती देवून बोलाविले. आग विझविण्याचा प्रयत्न केल्यानंतर येथील नगर पालिकेला माहिती देवून अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर अग्नीशमन दलाने आग आटोक्यात आणली. आगीत विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या वाहनाचे ४ नवीन टायर किंमत अंदाजे ३६ हजार रुपये, ५ जुने टायर, ७५०० हजार रूपयाचे ३ डिझेल कॅन असे ४३ हजार ५०० रुपयाचे नुकसान झाले आहे.महत्त्वाचे दस्ताऐवज पडक्या घरातआगीत सापडलेले दस्ताऐवज हे तेंदू व इतर गुन्ह्यातील महत्त्वाचे दस्ताऐवज होते. ते संपुर्ण दस्ताऐवज व्यवस्थित ठेवणे आवश्यक होते. मात्र येथील वनाधिकाºयांनी हे संपुर्ण दस्ताऐवज पडक्या निवासस्थानात ठेवण्याचे कारण काय? याबाबत शंकाकुशंका व्यक्त केली जात आहे.वरिष्ठ अधिकाºयांचे वनाधिकाºयांना अभयमूल वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी आहे. त्यांचे व वनाचे रक्षण करण्याची जबाबदारी वनाधिकारी बोबडे यांची आहे. मात्र ते मुख्यालयी राहत नसल्याची बोंब आहे. असे असतानाही ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत असून त्यांना अभय दिले जात असल्याची चर्चा आहे.
वनवसाहतीतील सदनिकेला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 12:27 AM
येथील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वनवसाहतीतील एका सदनिकेला आग लागल्याने महत्त्वाच्या दस्ताऐवजासह डिझेल व टायर जळून खाक झाल्याची घटना बुधवारी रात्री अडीच वाजताच्या सुमारास घडली.
ठळक मुद्देमूल येथील घटना : आगीचे कारण अस्पष्ट