लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : ब्रम्हपुरी वनविभागांतर्गत खडसंगी गावाजवळील मुरपार मिंझरी या वनविभागाच्या प्रादेशिकमध्ये कक्ष क्रमांक १३ मध्ये आग लागली आहे. विशेष म्हणजे, हे जंगल मुरपार या गावालगत असल्याने गावालाही धोका निर्माण झाला आहे. या आगीत मुल्यवान वनसंपदा जळून खाक होत आहे.मूरपारजवळच्या जंगलात आग भडकत असल्याचे पर्यावरण समितीचे अध्यक्ष कवडू लोहकरे यांना दिसले. त्यांनी जंगलजवळ जाऊन बघितले असता कुणीच वनकर्मचारी आढळून आले नाही. या आगीत मूल्यवान वनसंपदा व सागवानाची झाडे जळून खाक होत होती.त्यांनी जमेल तशी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र या आगीने रौद्र रुप धारण करण्यापूर्वी वनविभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आगीवर नियंत्रण मिळवावे, अशी मागणी कवडू लोहकरे यांनी केली आहे.
मूरपार जंगलात आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 10:49 PM
ब्रम्हपुरी वनविभागांतर्गत खडसंगी गावाजवळील मुरपार मिंझरी या वनविभागाच्या प्रादेशिकमध्ये कक्ष क्रमांक १३ मध्ये आग लागली आहे. विशेष म्हणजे, हे जंगल मुरपार या गावालगत असल्याने गावालाही धोका निर्माण झाला आहे. या आगीत मुल्यवान वनसंपदा जळून खाक होत आहे.
ठळक मुद्देमूरपार जंगलात आग