शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

चंद्रपूर वीज केंद्राच्या जंगल परिसरात आगीचे तांडव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2019 11:30 PM

चंद्रपूर वीज केंद्राच्या जंगल परिसरात आज रविवारी सकाळी अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. सायंकाळी ६ वाजता ही आग आटोक्यात आली. मात्र यात जंगलाची मोठी हानी झाल्याची माहिती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदुर्गापूर : चंद्रपूर वीज केंद्राच्या जंगल परिसरात आज रविवारी सकाळी अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. सायंकाळी ६ वाजता ही आग आटोक्यात आली. मात्र यात जंगलाची मोठी हानी झाल्याची माहिती आहे.देशात चंद्रपूरमधील तापमानाने उच्चांक गाठला आहे. छोट्याशा ठिणगीचे रुपांतर मोठ्या आगडोंबात होण्यास येथे विलंब होणार नाही, असे येथील भीषण तापमान आहे. चंद्रपूर वीज केंद्र परिसरात असलेल्या जंगलात घडलेल्या या घटनेवरून त्याचीच प्रचिती येते. चंद्रपूर वीज केंद्राचा परिसर झुडुपांनी व्यापला आहे. वीज केंद्राच्या रिजेक्ट गेट ते इरई नदीलगत असलेल्या आवंडा गेटदरम्यान अ‍ॅश पाईपलगतच्या बाजूला असाच जंगलव्याप्त भाग आहे. या जंगलात अधिक प्रमाणात काटेरी बाभूळची झाडे आहेत. दरम्यान, रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास या झुडुपांना अचानक आग लागली. क्षणातच आगीने रौद्ररुप धारण केले. जराही विलंब न करता वीज केंद्राचे अग्निशमन पथकाने आग विझविण्याचे काम सुरु केले. मात्र, उष्ण तापमानाने ही आग अधिकच भडकत असल्याने मनपाच्या अग्निशमन पथकाला पाचारण करण्यात आले. मनपाच्या अग्निशमन विभागाचे तीन वाहन घटनास्थळी दाखल झाले.े एकूण वाहनातील पथकाने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केला. सायंकाळी ६ वाजतादरम्यान ही आग अग्निशमन दलाच्या शर्तीच्या प्रयत्नाने आटोक्यात आली. आगीत सारे जंगल भस्मसात झाले. मात्र कुठलीही प्राणहानी वा वित्तहाणी झाली नसल्याची माहिती आहे.पेट्रोल पंपवर दुचाकी पेटलीतुकूम येथे असलेल्या रोहित पेट्रोल पंपवर एका दुचाकीला अचानक आग लागली. तेथील कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधनाने तत्काळ आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला. रविवारी दुपारी १ ते १.३० वाजताच्या सुमारास एका दुचाकीस्वाराने तुकूम येथील रोहित पेट्रोलपंपवर पेट्रोल भरले. त्यानंतर त्याने दुचाकी सुरु केली. त्याच वेळेत दुचाकीने पेट घेतला. दुचाकीस्वार घाबरुन दुचाकी सोडून तेथून पळून गेला. वेळीच तेथील कर्मचाऱ्यांनी ही आग विझविली त्यामुळे येथील पुढील मोठा अनर्थ टळला.

टॅग्स :fireआग