चामोर्शीतील घटना : १० लाख रूपयांचे झाले नुकसानचामोर्शी : येथील तहसील कार्यालय बायपास रोडवर असलेल्या दुकानगाळ्यांमध्ये अंजली कलेक्शन हे रेडिमेड साडी दुकान सहा महिन्यांपूर्वी नव्याने सुरू करण्यात आले होते. २५ एप्रिलच्या रात्री ८.३० ते ९ च्या दरम्यान इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट होऊन दुकानाला आग लागली. यात मालकाचे १० लाखांचे नुकसान झाले आहे. २५ एप्रिल रोजी दिवसभर दुकानाचा व्यवसाय करून दुकान मालक सुदेव महेंद्र डे रा. चामोर्शी हे रात्री ८ वाजता दुकान बंद करून येणापूर येथे गेले होते. त्यानंतर तेथे पोहोचल्यावर काही वेळाने त्यांना तुमच्या दुकानात आग लागल्याची माहिती भ्रमणध्वनीवरून देण्यात आली. आग तीव्र असल्याने नागरिकांनी शटर तोडून आग विझविण्याचा प्रयत्न केला, तसेच टँकर, गडचिरोली येथील अग्निशामक यंत्रणेला बोलाविण्यात आले. परंतु काहीही उपयोग झाला नाही. तोपर्यंत संपूर्ण रेडिमेड दुकान जळून खाक झाले होते. या घटनेची चामोर्शी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. नुकसान भरपाई देण्याची मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)
रेडिमेड कापड दुकानाला आग
By admin | Published: April 27, 2016 1:21 AM