शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

जटपुरातील सोनी मार्केटिंगला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 10:29 PM

येथील जटपुरा गेटजवळ अगदी मुख्य रस्त्यावर असलेल्या सोनी मार्केर्टिगला शनिवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. हा परिसर अत्यंत गजबजलेला असल्याने एकच खळबळ उडाली. अग्निशमन दलांना पाचारण केल्यानंतर सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.

ठळक मुद्देशार्ट सर्किटने केला घात : आजुबाजुच्या व्यावसायिकांमध्ये खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येथील जटपुरा गेटजवळ अगदी मुख्य रस्त्यावर असलेल्या सोनी मार्केर्टिगला शनिवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. हा परिसर अत्यंत गजबजलेला असल्याने एकच खळबळ उडाली. अग्निशमन दलांना पाचारण केल्यानंतर सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.जटपुरा गेटजवळ प्रियदर्शिनी चौक मार्गावर व्यावसायिकांची चाळ आहे. या चाळीतील सोनी मार्केटींगच्या तिसऱ्या माळ्यावर दुपारी ४ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. यावेळी दुकान सुरूच होते. दुकानातील कर्मचारीदेखील पहिल्या आणि दुसºया माळ्यावर काम करीत होते. अचानक तिसºया माळ्यावर आग लागल्याने एकच धावपळ उडाली. कर्मचारी इमारतीबाहेर आले. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर महानगरपालिकेच्या अग्निशमन पथकालाही पाचारण करण्यात आले.घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीस व अग्निशमन विभागाचे दोन पथक घटनास्थळी दाखल झाले. तब्बल अडीच तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. सदर आग शार्ट सर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. या आगीत किती नुकसान झाले, याबाबत अद्याप कळू शकले नाही. दुकानमालक आणि पोलीस यांच्या उपस्थितीत पंचनामा झाल्यानंतरच नुकसानीचा आकडा समजू शकणार आहे. रामनगरचे पोलीस उपनिरीक्षक कापडे, वाघमारे, मोरे, गुरुनुले घटनास्थळावर होते.मोठा अनर्थ टळलासोनी मार्केटींग ज्या ठिकाणी स्थित आहे, त्याला लागूनच इतर व्यावसायिकांची मोठमोठी दुकाने आहे. याशिवाय या व्यावसायिक चाळीच्या मागे नागरी वस्तीही आहे. सोनी मार्केटींगला लागलेली आग लवकर आटोक्यात आली नसती किंवा रात्रीच्या सुमारास ही आग लागली असती तर मोठा अनर्थ घडला असता. सुदैवाने तसे झाले नाही.वाहतूक खोळंबलीजटपुरा गेट ते प्रियदर्शिनी चौक हा मार्ग अत्यंत वर्दळीचा आहे. दिवसभर हजारो वाहने या मार्गावर धावत असतात. याच मार्गावरील दुकानात आग लागल्याने बघ्यांची एक गर्दी उसळून वाहतूक खोळंबली. लगेच पोलिसांचा ताफा आणि दंगा नियंत्रण पथक दाखल झाले. त्यानंतर हा मार्ग काही वेळासाठी रहदारीकरिता बंद करण्यात आला.