या कार्यक्रमाला इनरवील क्लबचे अध्यक्ष खंडाळकर, डॉ. माला प्रेमचंद, साईप्रकाश अकॅडमीचे नागपूर येथील त्वचातज्ज्ञ बुशरा मालवीया प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. वधू स्पर्धा, सुंदरी स्पर्धा जिल्हास्तरावर राबवण्यात आली. या दोन्हीही स्पर्धेत एकूण १२० स्पर्धकांनी सहभाग दर्शविला. नववधू स्पर्धेचे परीक्षण नागपूरचे मेकअप आर्टिस्ट जैन व चंद्रपूरच्या सरिता डांगे यांनी केले. सुंदरी स्पर्धेचे परीक्षण गडचिरोलीच्या मनीषा उईके, नागपूरच्या नेहा चवरे, पुणेच्या सरिता झाडे यांनी केले. प्रास्ताविक उज्ज्वला यामावर यांनी केले. संचालन व आभार नयना गंधम यांनी केले. कार्यक्रमासाठी सुनीता खंडाळकर, डॉ. माला प्रेमचंद, सुनीता थेरे, सरिता बेलोरकर, नीलिमा मसे, नमिता पाटील, संगीता कांबळे, माधुरी घोडेस्वार, सेजल बिश्वास, प्रीती परचाके, टीना सहस्त्रबुद्धे, प्रीती शिवरकर, स्यामुवेल गंधम, आनंद क्षीरसागर, किशोर खंडाळकर, अभिषेक आदींनी सहकार्य केले.
270721\img-20210725-wa0045.jpg
भद्रावती येथे प्रथमच नॉलेज इज पॉवर अँड ब्युटी हंगामा