रवी जवळे ।लोकमत न्युज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनावरील लस जानेवारी महिन्यात येणार असल्याच्या अंदाज आहे. या अनुषंगाने राज्याच्या प्रधान सचिवांनी जिल्हाधिकारी यांना एक पत्र पाठवून लस द्यायची झाली तर ती प्रथम कोणाला द्यायची, याबाबतचा अहवाल तयार करायला सांगितला आहे. हा अहवाल तयार झाला असून लस आलीच तर ती सर्वप्रथम आरोग्यसेवेतील १० हजार ५८८ लोकांना दिली जाणार आहे.सर्वप्रथम आरोग्यसेवा मजबुत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये डॉक्टर्स, परिचारिका, टेक्नीशियन, आरोग्यसेवेतील वाहनचालक, अंगणवाडी सेविका, खासगी क्षेत्रातील डॉक्टर्स व त्यांचा संपूर्ण स्टाफ यांचा समावेश असणार आहे.कोरोनाची सद्यस्थितीजिल्ह्यात कोरोना रुग्णांची एकूण संख्या १५ हजार ७७२ इतकी आहे. यातील १२ हजार ६७० रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना डिस्चार्ज करण्यात आले आहे. आता जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या दोन हजार ८७० आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण २३२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.कोरोनाचा संसर्ग हळूहळू कमी होत आहे. मात्र तोंडावर दिवाळीसारखा मोठा सण आहे. त्यामुळे नागरिकांनी गाफील राहू नये. बाजारपेठेत अकारण गर्दी करू नये. मास्क, सोशल डिस्टन्सिंग व सॅनिटायझर या त्रिसुत्रीचा नियमित वापर करावा. लस येईस्तोवर सर्वांनी संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.-अजय गुल्हाने,जिल्हाधिकारी, चंद्रपूर.लस येईल तेव्हा...सध्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.३८ टक्के आहे. प्रशासनाची जनजागृती मोहीम सुरूच आहे. त्यामुळे हा दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.सध्याचा रिकव्हरी रेट ८० टक्के आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग उशिरा सुरू झाला. त्यामुळे राज्याच्या तुलनेत हा रेट कमी असला तरी जानेवारीपर्यंत रिकव्हरी रेट आणखी वाढेल.कोरोना रुग्णांचा डबलिंग रेट ६६.९ टक्के आहे. नव्या रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत असल्याने जानेवारीपर्यंत डबलिंग रेट आणखी वाढेल.
सर्वात आधी लस १०,५८८ जणांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2020 5:00 AM
कोरोनाचा संसर्ग हळूहळू कमी होत आहे. मात्र तोंडावर दिवाळीसारखा मोठा सण आहे. त्यामुळे नागरिकांनी गाफील राहू नये. बाजारपेठेत अकारण गर्दी करू नये. मास्क, सोशल डिस्टन्सिंग व सॅनिटायझर या त्रिसुत्रीचा नियमित वापर करावा. लस येईस्तोवर सर्वांनी संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
ठळक मुद्देआरोग्य सेवेतील कर्मचारी। प्रधान सचिवांच्या निर्देशानंतर प्रशासनाने तयार केला डेटा