निलकंठ नैताम ।लोकमत न्यूज नेटवर्कपोंभूर्णा : जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील नगर पालिकांना लाजवेल अशी देखणी इमारत पोंभूर्णा नगर पंचायतीसाठी तयार होत आहे. काही दिवसातच ती पूर्ण होणार आहे. मुुख्य बसस्थानक चौकामध्ये असलेल्या आणि सर्व सोयीनिशी अद्ययावत असलेली ही इमारत नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.चार कोटी ५० लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या इमारतीमुळे व विविध विकास कामांमुळे पोंभूर्णा शहराचे तूर्तास चित्र बदलले आहे. बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार, राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोंभूर्णा शहरामध्ये विकासकामाचा सपाटा सुरु केला आहे. काही वर्षापूर्वी मागास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोंभूर्ण्याचा चेहरा-मोहरा बदलला आहे. तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्यासाठी ग्रामीण रुग्णालय पोंभूर्णा शहरामध्ये उभे होत आहे. त्याचेही काम जलद गतीने सुरू आहे. तहसील कार्यालय व पंचायत समितीच्या इमारतीही अतिशय देखण्या आहेत. त्यातच पाच कोटी २५ लाख रुपये खर्च करून दीड एकर जागेत अत्याधुनिक बसस्थानक पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून परिवहन विभाग साकारत आहे. नगर पंचायत कार्यालयामागे उमरी-पोतदार-बल्लारपूर रस्त्यालगत प्रशस्त जागेत हे बसस्थानक विकसित होत आहे.स्थानिक परिसरातील नागरिकांना योग्य सेवा मिळावी यासाठी परिवहन विभागाने स्मार्ट बसस्थानकाची निर्मिती करण्याची व प्रवाशांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळाचा प्रयत्न सुरू आहे. पाटबंधारे विभागामार्फत तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम तसेच शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी एटीएम मशीन बसविण्यात आली आहे.दोन कोटी ७५ लाख रुपये किंमतीचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी इको-पार्क वनविभागाअंतर्गत तयार करण्यात आले आहे. शहर व परिसरातील बसुसंख्य नागरिक याचा आश्वाद घेत आहेत.तालुक्यातील घाटकुळ येथील वैनगंगा नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. त्याचे नुकतेच लोकार्पण सुद्धा करण्यात आल्याने गडचिरोली-चंद्रपूर या दोन्ही जिल्ह्याचा मार्ग सुकर झाला आहे. स्थानिक परिसरातील नागरिकांना कमी अंतराने प्रवास करताना दिलासा मिळाला आहे. शहरातून जाणाºया मुख्य रस्ताही कोट्यावधी रुपये खर्च करून तयार करण्यात आला आहे.मागास अशी ओळख असलेल्या पोंभूर्णा तालुक्याचा या विकासकामामुळे मोठ्या प्रमाणात विकास झाला असून संपूर्ण कायापालट झाला आहे. त्यामुळे जुनी मागास अशी ओळख आता पुसली जावून जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात पोंभूर्णाचे नाव घेतल्या जाईल, असेही बोलल्या जात आहे.
पोंभूर्ण्यात साकारतेय राज्यातील नगर पंचायतीची पहिली सुसज्ज इमारत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 10:57 PM
जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील नगर पालिकांना लाजवेल अशी देखणी इमारत पोंभूर्णा नगर पंचायतीसाठी तयार होत आहे. काही दिवसातच ती पूर्ण होणार आहे. मुुख्य बसस्थानक चौकामध्ये असलेल्या आणि सर्व सोयीनिशी अद्ययावत असलेली ही इमारत नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
ठळक मुद्देअत्याधुनिक सुविधांनी युक्त : परिसराचा बदलला चेहरामोहरा