शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

जिल्ह्यातील मासेमारी संकटात

By admin | Published: August 23, 2014 1:41 AM

यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे अत्यल्प पर्जन्यमान व कडक उन्हामुळे पाण्याने दुभिक्ष्य निर्माण झाले आहे.

भेजगाव : यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे अत्यल्प पर्जन्यमान व कडक उन्हामुळे पाण्याने दुभिक्ष्य निर्माण झाले आहे. याचा विपरीत परिणाम मासेमारी व्यवसायावर होत आहे. अनेक ठिकाणच्या तलाव, बोडी, नदी नाल्यामधील जलसाठा अत्यंत कमी असल्याने मासेमारांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे मत्स्य व्यवसाय संकटात असून मासेमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. यावर्षी अत्यंत कमी प्रमाणात पाऊस पडल्याने नदी, नाले, तलाव, बोड्या व इतर जलसाठ्यात पाणी नाही. परिसरात मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जात असून मासेमारी संस्था कार्यरत आहेत. मात्र सध्यास्थितीत निर्माण झालेली परिस्थिती संस्थाना चिंतेत टाकणारी आहे. गेल्या दोन ते चार वर्षातील कमी पर्जन्यमान व उन्हाळ्यातील प्रचंड तापमाने तलावातील पाण्याचा साठा आवश्यकतेपेक्षा कमी झाला आहे. तीव्र उष्णतेमुळे कमी पाण्यातील मत्स्यबीज नष्ट झाल्याने तीन वर्षापासून भेजगाव येथील मासेमारी संस्था शासनाकडून कोणतेही आर्थिक सहाय्य दिले जात असताना त्यांना मिळणाऱ्या थोड्याफार आर्थिक लाभावर मस्यबीज खरेदी करावे लागले. त्यातला त्यात बीज कंपन्याकडून सुद्धा संस्थेची फसवणूक होत असल्याने अर्धेअधिक मस्यबीज सुरुवातीलाच नष्ट होतात. उरलेल्याची योग्य वाढ होत नाही. त्यातही बीजच्या वाढीसाठी अपेक्षेप्रमाणे पाणीसाठा उपलब्ध नसतो. त्यामुळे मुदतीपूर्वी मासेमारी करुन नाईलाजाने बाजारात विक्री करावी लागते. अनेक मासेमारी सहकारी संस्था तोट्यात आहेत. भेजगाव मासेमारी संस्थेकडे सध्या रानतलाव,सितला तलाव, पीपरी दीक्षित तलाव, भंजाठी तलाव, रंगारी तलाव लिलाव तत्वावर असून त्यात पाणीसाठा अत्यल्प असल्याने खर्चापेक्षा उत्पन्न कमी होत आहे. या संस्था आर्थिक संकटात असून सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)