चंद्रपूर : सावली येथील जयभीम वाचनालयाच्या रविवारी पार पडलेल्या निवडणुकीत प्रस्थापित गटाने विरोधी गटाला एकतर्फी मात देत पुन्हा आपले वर्चस्व स्थापित केले आहेत. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत वाचनालयाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत गेडाम, माजी सचिव छत्रपती गेडाम यांच्या नेतृत्वातील गटाचे सर्व ११ ही उमेदवार बहुमताने निवडून आले, तर विरोधी गटातील उमेदवारांना ३० मतांच्या वर मजल मारता आली नाही.
संगीता गेडाम ६७, संदीप गेडाम ६६, घनश्याम भडके ६४, माधुरी गेडाम ६४, लता लाकडे ६२, हेमलता गेडाम ६०, नानाजी बोरकर ६०, सुनीता बोरकर ६०, यशपाल गोंगले ५९, विशाखा गेडाम ५८, योगिता गेडाम ५७ मते पटकावून विजयी ठरले आहेत, तर विरोधी गटात उदय गडकरी ३०, वेणूबाई बोरकर २९, मनोरमा गेडाम २८, अरविंद गेडाम २६, उत्तम गेडाम २४, जगदीप दुधे २१, धर्मेश बोरकर २१, इंदुबाई बोरकर २० मतांवर समाधान मानावे लागले.
सावली येथील जयभीम वाचनालयाची स्थापना १९८२ साली झाली. तेव्हापासून आजपर्यंत या वाचनालयाची निवडणूक बिनविरोध आपसी तडजोडीने होत होती. मात्र, यंदा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच ३१ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे निवडणुकीत अत्यंत चुरस निर्माण झाल्याने संपूर्ण गावाचे लक्ष लागले होते. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १२ जणांनी आपले अर्ज मागे घेतले होते. प्रस्थापित गटाचे ११ तर विरोधी गटाचे ८ उमेदवार रणांगणात उभे होते. निवडणुकीत ८३ टक्के मतदान झाले. सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान निकाल घोषित करण्यात आला. यात प्रस्थापित गटाचे अकराही उमेदवार भरघोस मतांनी विजयी झाले. विजयी होतास मोठा जल्लोष करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. पी. पी. शेंडे, विजय सातरे, बाळा गेडाम, योगेश आदे आदींनी काम बघितले.