शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊतांनी जागावाटपावर बोलणं बंद करावं, त्यापेक्षा...; नाना पटोलेंनी थेट सांगितले
2
अमित ठाकरेंनी लढण्याचा निर्णय दिल्लीतून झाला; संजय राऊतांचा दावा
3
युगेंद्र पवारांनी उमेदवारी अर्ज भरताच शरद पवारांनी दिला बारामती जिंकण्याचा कानमंत्र; म्हणाले...
4
मोठी बातमी! पुढच्या सीरिजमध्ये गौतम गंभीर प्रशिक्षक नाही! 'या' दिग्गज खेळाडूवर जबाबदारी
5
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सची किंमत झाली अर्धी, काय आहे कारण, तुमच्याकडे आहेत का?
6
Dhanteras 2024: धनत्रयोदशीवर राहूची नजर; 'या' दोन तासांत खरेदी टाळा; जाणून घ्या शुभ मुहूर्त!
7
मर्डर मिस्ट्री! घरातून जिमला गेली आणि परत आलीच नाही...; ४ महिन्यांनी सापडला सांगाडा
8
“मला बारामतीची माहिती, तितकी कुणाला नाही; युगेंद्र पवार मोठ्या मतांनी जिंकतील”: शरद पवार
9
तिकीटावरून कंडक्टर, महिला पोलिसाचा वाद झाला; राजस्थान-हरियाणाने एकमेकांच्या १०० हुन अधिक बसच्या पावत्या फाडल्या...
10
माघारीसाठी दबाव, पण सदा सरवणकरांचं अखेर ठरलं; मुलाच्या व्हॉट्सॲप स्टेटसची चर्चा
11
एका शेअरवर ९ शेअर्स फ्री देणार 'ही' कंपनी; वर्षभरात दिलाय ४००% चा रिटर्न, शेअर सुस्साट...
12
पाकिस्तान क्रिकेटमध्ये पुन्हा भूकंप! गॅरी कस्टर्न यांचा राजीनामा; कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क
13
Arvind Kejriwal : "भाजपाला मत दिलं तर..."; अरविंद केजरीवाल यांचा दिल्ली निवडणुकीबाबत मोठा दावा
14
“उद्धव अन् राज यांनी अजिबात एकत्र येऊ नये”; अमित ठाकरे स्पष्टच बोलले, कारणही सांगितले
15
"प्रसिद्ध अभिनेत्याने मला एकटीला बोलवलं...", ईशा कोप्पिकरला आला होता कास्टिंग काऊचचा अनुभव
16
मविआमधील तिढा सुटेना, शरद पवार यांनी जागावाटपाबाबत दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...  
17
Waaree Energies Share Price : वारी एनर्जीच्या आयपीओनं केलं मालामाल, ७०% प्रीमिअमवर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी मोठा फायदा
18
मोठी बातमी! जनगणना पुढील वर्षीपासून होण्याची शक्यता; लोकसभा मतदारसंघांवर मोठा परिणाम होणार
19
भारताच्या अरमान भाटीयाने जिंकली इंडिया मास्टर्स पिकलबॉल स्पर्धा; अमेरिकन खेळाडूला हरवलं!
20
"रशिया-युक्रेन युद्ध मोदी थांबवू शकतात"; युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी व्यक्त केला विश्वास

बल्लारपुरात ठिकठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 4:33 AM

बल्लारपूर : भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ७४ वा वर्धापनदिन शहरातील शासकीय, निमशासकीय कार्यालयात उत्साहाने साजरा करण्यात आला. तहसील कार्यालय नवीन प्रशासकीय ...

बल्लारपूर : भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ७४ वा वर्धापनदिन शहरातील शासकीय, निमशासकीय कार्यालयात उत्साहाने साजरा करण्यात आला. तहसील कार्यालय नवीन प्रशासकीय भवन प्रांगणात ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी उपविभागीय अधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी-पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी तहसीलदार संजय राईंचवार, मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, पोलीस निरीक्षक उमेश पाटील, नायब तहसीलदार रमेश कुलसंगे, तसेच अजय मेकलवार नगराध्यक्ष हरीश शर्मा व शहरातील मान्यवरांची उपस्थिती होती.

नगरपरिषद कार्यालयात शहराचे प्रथम नागरिक हरीश शर्मा यांनी राष्ट्रीय ध्वज फडकावून सलामी दिली. यावेळी मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, कार्यालय अधीक्षक संगीता उमरे व नगरसेवक नगरपरिषदचे सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

टेकडी विभागातील जयभीम चौकात जेबीबीएस ग्रुपच्यावतीने ध्वजारोहण कार्यक्रमात राष्ट्रीय ध्वज सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद रासकर यांच्या हस्ते फडकविण्यात आला. यावेळी पीएसआय स्नेहा साळुंखे, आयोजक संतोष बेताल व जेबीबीएस सदस्यांची उपस्थिती होती. याप्रसंगी कोरोना काळात निर्भयपणे रुग्णांना सेवा देणारे माजी नगराध्यक्ष डॉ. मधुकर बावणे यांचा सत्कार करण्यात आला.

शहरातील मागासलेला परिसर शांतीनगर या ठिकाणी आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष रवी पुप्पलवार यांनी तिरंगा फडकवून सलामी दिली. कार्यक्रमात राकेश वडस्कर, सय्यद अफजल अली, ॲड. पवन वैरागडे व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बालकांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ च्या आवारात डॉ. संतोष रायपुरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अग्निशमन दलानी परेड संचालन केले. कार्यक्रमात दवाखान्याचे सर्व कर्मचारी व प्रमुख पाहुणे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, उपमुख्याधिकारी जयवंत काटकर यांची उपस्थिती होती.

160821\tahsil=-.jpg

ध्वजारोहण करून सलामी देताना उपविभागीय अधिकारी डाॅ.दीप्ती पाटील