आशिष खाडे, पळसगाव : बल्लारपूर तालुक्यात व पळसगाव परिसरात सतत पडत असलेल्या पावसामुळे पळसगाव येथील नाल्याला पूर येऊन शेतशिवाराला पुराचा जोरदार फटका बसलेला आहे. अनेक शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, तूर अशा नानाविध पिकांची लागवड केली, परंतु पुराच्या पाण्यामुळे संपूर्ण शेती आता पाण्याखाली जाऊन पीक नष्ट होण्याच्या मार्गांवर आहे.
शेतकऱ्यांनी विविध सोसायटी, बँक यांच्याकडून कर्ज घेऊन पिकाची लागवड केली. त्या पिकाला आजपर्यंत लागणारे खत, औषधी याचा खर्चही केला, परंतु अचानक आलेल्या पुरामुळे आता संपूर्ण पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. आता कर्जाचा भरणा कसा करायचा, हा मोठा प्रश्न शेतकरी वर्गाला पडलेला आहे, तसेही शासन करत असलेली मदत उत्पादनापेक्षा तोकडीच असते.
त्यामुळे शासनाने तत्काळ पुराची पाहणी करावी, योग्य तो पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी आहे.
080921\img20210908095558.jpg~080921\img20210908095642.jpg
caption~caption