चंद्रपूर : वर्धा, पैनगंगा नद्यांना आलेल्या पुरामुळे राजुरा, कोरपना व जिवती तालुक्यांचा चंद्रपूरशी संपर्क तुटला. वर्धा नदीच्या बल्लारपूर मार्गावरील पुलावरून आता पाणी वाहने सुरू झाले आहे. वर्धा नदीचा भोयगाव मार्गावरील पूल रात्रीच बुडाला होता.
पैनगंगा नदीला आलेल्या पुराचे पाणी कोरपना तालुक्यातील अंतरगाव गावात शिरले. तसेच परसोडा, रायपूर, पारडी ,अकोला, कोडशी बू,/ खू , जेवरा, पिपरी, तुलसी, मेहंदी, वनोजा , सांगोडा, कारवाई, इरई, भारोसा आदी सह २२ गावच्या नदी लगत शेतशिवारात व गाव वेशित पाणी शिरले आहे. नवनिर्मित कोरपणा - मुकुटबन मार्गावरील पारडी पुलाचे निर्मिती कार्य करणाऱ्या जेसीपी व बांधकाम साहित्य बुडाले गेले आहे. भोयगाव - धानोरा, वनसडी - अंतरगाव , पार्डी - खातेरा, कोडशी - पिपरी आदी मार्ग बंद झालेले आहे.