रिॲलिटी चेक लोगो टाकणे
शेतातील उभे पीक गेले वाहून : अतोनात नुकसान
संघरक्षित तावाडे
जिवती : महाराष्ट्रातील जिवती ते तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जाणाऱ्या मुख्य मार्गावर तेलंगणातील गादीगुडा येथील नाल्याला पूर आल्यामुळे त्याचा फटका महाराष्ट्रातील काही गावांना बसला आहे यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पीक वाहून गेले आहे.
तेलंगणातील गादिगुडा या गावाला मोठा नाला असून सध्या सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे नाल्याला पूर आला आहे. या नाल्याच्या पुरामुळे काही कि.मी. अंतरावर महाराष्ट्राच्या सेवादासनगर, जोडणघाट, महाराजगुडा, वणी (बु) या गावातील शेतकऱ्यांच्या जवळपास ६० टक्के शेती आहे. परंतु या नाल्यास शुक्रवारी रात्री उशिरा मोठा पूर आल्याने शेतीचे नुकसान झाले आहे.
बॉक्स
यांचे झाले नुकसान
सेवादासनगर येथील नाथराव हरी राठोड यांची संपूर्ण साडेतीन एकर शेतातील पीक पुरात वाहून गेले. तसेच वामन राठोड, कनिराम राठोड, शंकर राठोड, सुलाबाई चव्हाण, उत्तम जाधव, झालुबाई राठोड यासह गावातील २० शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. महाराजगुडा येथील सात शेतकऱ्यांचे तर जोडणघाट व वणी येथीलही काही शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. तेलंगणा राज्यातील नदीकाठावरील महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकऱ्यांचे पीक वाहून गेल्यामुळे प्रशासन याकडे लक्ष देऊन भरपाई देणार का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
240721\screenshot_20210724_095702.jpg
पुराच्या पाण्याने शेतातील उभे पीक वाहून गेल्याचे दृश्य