लोकमत न्यूज नेटवर्कप्रवीण खिरटकरचंद्रपूर : उर्जानिर्मिती प्रकल्पातून निघणाऱ्या ‘फ्लॉय अॅश’ची विल्हेवाट लावणे ही बाब मागील कित्येक वर्षांपासून डोकेदुखी ठरली आहे. आता ही फ्लॉय अॅश रस्ते व उड्डाणपूल बांधकामाकरिता वापण्यात येणार आहे. केंद्र सरकारने नुकतीच परवानगी दिल्याने उर्जा निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांना मोठा दिलासा मिळाला आहे.मागील काही वर्षात भारतात अनेक खाजगी वीज निर्मिती तसेच राज्य सरकारने उभारलेल्या कोळशापासून वीज निर्मिती प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर फ्लॉय अॅश निघते. या फ्लॉय अॅशची विल्हेवाट लावण्याचा गंभीर प्रश्न या वीज निर्मिती प्रकल्पांना भेडसावतो आहे. काही वर्षापूर्वी ही फ्लॉय अॅश सिमेंट कारखाण्यांना पाठविली जात होेती. शासकीय इमारती बांधकामाकरिता फ्लॉय अॅशपासून तयार केलेल्या विटा वापरणाऱ्यावर बंधक घालण्यात आल्याने काहीअंशी हा प्रश्न निकाली निघाला होता. परंतु पूर्णपणे विल्हेवाट लावली जात नसल्याने फ्लॉय अॅशच्या ठिगाºयाने नजीक राहणाºया नागरिकांंचे आरोग्य धोक्यात आले होते. अनेकांना श्वसनाचे आजार जडले. याबाबत शासन दरबारी अनेक तक्रारीही झाल्या.केंद्र सरकारने फ्लॉय अॅश रस्ता बांधकाम व उड्डाण पुलाच्या बांधकामाकरिता वापरण्याची परवानगी नुकतीच दिली आहे. यामध्ये वाहतुकीचा खर्च उर्जा निर्मिती प्रकल्पाला करावा लागणार आहे. वाहतुक करण्यापूर्वी राख ओली केल्यानंतर वाहनात भरली जाणार आहे. यामुळे फ्लॉय अॅशपासून नागरिकांना जडणारे आजार कमी होईल, असेही केंद्र सरकारला वाटत आहे.अवैध उत्खननावर आळारस्त्याचे व उड्डाण पुलाच्या बांधकामाकरिता मोठ्या प्रमाणात गौण खनिजाची आवश्यकता असते. त्यामुळे पुरवठाधारक मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन करूनच पुरवठा करीत असल्याचे मानले जात होते. आता उड्डाल पुल व रस्ता बांधकामाकरिता फ्लॉय अॅश वापण्यात येणार असल्याने गौण खनिजाची मोठी बचत होणार असून अवैध उत्खननावर आळा बसण्याची शक्यता आहे.शासनाच्या या निर्णयामुळे फ्लॉय अॅशची मोठ्या प्रमाणात विल्हेवाट लागणार असून स्थानिक वाहतुकदरांना यापासून मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे.- प्रमोद मगरे, जिल्हा प्रमुख, शिव वाहतूक सेना.
राज्यात उड्डाणपूल व रस्ते बांधकामात वापरणार ‘फ्लॉय अॅश’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2018 2:55 PM
उर्जानिर्मिती प्रकल्पातून निघणाऱ्या ‘फ्लॉय अॅश’ची विल्हेवाट लावणे ही बाब मागील कित्येक वर्षांपासून डोकेदुखी ठरली आहे. आता ही फ्लॉय अॅश रस्ते व उड्डाणपूल बांधकामाकरिता वापण्यात येणार आहे.
ठळक मुद्देउर्जा निर्मिती प्रकल्पांना मोठा दिलासा