शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
3
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
4
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
5
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
6
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
7
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
8
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
9
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
10
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
11
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
12
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
13
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
14
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
15
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
16
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
17
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
18
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
19
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
20
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या

सावली तालुक्याला १ लाख ९८ हजार वृक्ष लागवडीचे लक्ष

By admin | Published: June 19, 2016 12:51 AM

वनविभागाच्या वतीने महाराष्ट्रात दोन कोटी वृक्ष लागवड केली जाणार असून सावली तालुक्याला १ लाख ९८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असल्याची माहिती, ..

नागरिकांना आवाहन : वनविभागाचे नियोजन सावली : वनविभागाच्या वतीने महाराष्ट्रात दोन कोटी वृक्ष लागवड केली जाणार असून सावली तालुक्याला १ लाख ९८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असल्याची माहिती, वनपरिक्षेत्राधिकारी एम. पी. राठोड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.वृक्ष लागवडसंदर्भात शासकीय कार्यालये तसेच शाळा, महाविद्यालये, खासगी संस्था यांच्या माध्यमातून कार्यक्रम आखण्यात आला आहे. याशिवाय तालुक्यात असणाऱ्या सर्व बँकांचाही वृक्ष लागवडीकरिता सहभाग राहणार असल्याचे सांगितले आहे.१ जुलै रोजी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून विविध स्तरांवर जाहिरातीच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा आयोजित करुन नागरिकांना वृक्ष लागवडीचे महत्त्व पटवून देण्याचे कार्य सावली वनपरिक्षेत्र कार्यालयाचे कर्मचारी करीत आहेत. एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष वनपरिक्षेत्राधिकारी एम. पी. राठोड यांनी आपल्या वाहनावर दोन कोटी वृक्ष लागवडीचे फलक लावून ध्वनिक्षेपणाद्वारे स्वत: प्रचार व प्रसार यंत्रणेत गुंतले आहेत. वृक्ष लागवड हा राष्ट्रीय कार्यक्रम असून सर्वच शासकीय विभाग व खासगी कार्यालयाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्यापरीने वृक्ष लागवडीची जबाबदारी घेतली आहे. मात्र शासनाने वृक्ष लागवड व संवर्धनासाठी निर्माण केलेला सामाजिक वनिकरण विभाग कुठेच पुढाकार घेताना आढळून आलेला नाही. (तालुका प्रतिनिधी)