लोकमत न्यूज नेटवर्कदुर्गापूर : तंत्रज्ञानाचा वीज उत्पादन वाढीत सहभाग, कार्यकुशलता व त्यांच्या कलागुणांना वृद्धींगत करण्याकरिता ‘माझे महानिर्मितीत योगदान’ या विषयावर वीज केंद्रात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी वीज उत्पादन वाढीसाठी विचारमंथनही करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता जयंत बोबडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई महानिर्मितीचे संचालक चंद्रकांत थोटवे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.चंद्रपूर महाऔष्णिक केंद्र महाराष्ट्राला ३० टक्के विजेचा पुरवठा करणारे विद्युत केंद्र आहे. ही वीज निर्मिती करण्याकरिता वीज केंद्रातील तंत्रज्ज्ञ, अभियंते व अधिकारी अहोरात्र झटत असतात. याचा वीज निर्मितीत सहभाग, कार्यकुशलता व त्यांच्या कलागुणांना वृद्धींगत करण्याकरिता येथील मुख्य अभियंता जयंत बोबडे सतत प्रयत्नशील असतात. याच उद्देशाने तंत्रज्ञानाकरिता ‘माझे महानिर्मितीत योगदान’ या विषयावर हितगुज करण्यात आले. याप्रसंगी पाहुणे म्हणून मंचावर तंत्रज्ज्ञ यांचे प्रतिनिधी सुभाष शेडमाके, शब्बीर शेख, रोशनी ठाकरे, मनीषा दड्डमवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात संचालक चंद्रकांत थोटवे, मुख्य अभियंता जयंत बोबडे व तंत्रज्ञ यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी मुंबईचे संचालक चंद्रकांत थोटवे म्हणाले, वीज केंद्रात वीज निर्मिती करीत असताना कामाचा ताण न घेता आपसातील सुसंवाद, कामाची आखणी व चर्चेच्या माध्यमातून कामाविषयाचे शिक्षण, तंत्र व गुणवत्ता यावर लक्ष केंद्रीत केल्यास पाच सुत्री कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यास मदत होते. याशिवाय वीज निर्मिती करण्यात कुठेच कमी पडणार नाही, असेही त्यांनी सांगितले. यासोबतच चांगल्या प्रतिचा कोळसा व सुटेभाग वेळेच्या आत उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. वीज केंद्राचे मुख्य अभियंता जयंत बोबडे यांनी कर्मचारी, अभियंता व तंत्रज्ञ यांच्यासोबत मी सदैव असल्याची जाणीव त्यांनी आपल्या भाषणातून करून दिली. महानिर्मितीचे जनसंपर्क अधिकारी यशवंत मोहिते यांनी पाचसुत्री कार्यक्रमाची भूमिका व त्यांचे होणारे फायदे तंत्रज्ञ यांच्यापुढे मांडले. ‘माझे महानिर्मिती कंपनीमध्ये योगदान’ यावर महादेव गव्हाळ, दादाराव तायडे, विलास निपाणे, स्वाती निमगडे, अतूल शिंदे, दमकोन्डावार, शब्बीर शेख, सुभाष शेडमाके, कुंदर काकडे, सुरेश माळी, विलास आत्राम, मधुकर काकडे आदींनी मनोगत व्यक्त केले.
वीज उत्पादन वाढविण्यावर भर द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 11:44 PM
तंत्रज्ञानाचा वीज उत्पादन वाढीत सहभाग, कार्यकुशलता व त्यांच्या कलागुणांना वृद्धींगत करण्याकरिता ‘माझे महानिर्मितीत योगदान’ या विषयावर वीज केंद्रात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
ठळक मुद्देजयंत बोबडे : ‘माझे महानिर्मितीत योगदान’वर हितगुज