तेलंगणा सीमेवरील जंगल : लाखोंचे सागवान व वन औषधी जळून खाकपाटण : जिवती तालुक्यातील हिरापूर येथील तेलंगणा सीमेवर जंगलात गेल्या दोन दिवसांपासून भीषण आग पाहायला मिळत आहे. या आगीत लाखो रुपयांचे सागवान व वन औषधी जळून खाक झाली आहे. मात्र वनविभागाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न होताना दिसून येत नसल्याने मौल्यवान जंगल संपदा धोक्यात आली आहे. महाराष्ट्र-तेलंगाना राज्याच्या सीमेवर जंगलात अवैध सागवान कटाई तेलंगनातील तस्करांकडून केली जाते. जंगलातील सागवान कटाई झाल्यानंतर तस्कराकडून जंगलाला आग लावण्यात येत आहे. यामुळे लाखोंचे सागवान व वन औषधी जळून खाक होत आहे. पाटण व चिखली बिटमध्ये येणाऱ्या हिरापूर, गोंदापूर, कोलांडी, डोंगरगाव या तेलंगणा राज्याच्या सीमेवर जंगलात भीषण आग सुरू आहे. त्यामुळे जंगली जनावरांनी गावाकडे धाव घेतली असून वनविभागाने याकडे तत्काळ लक्ष देण्याची मागणी आहे. (वार्ताहर)
वन तस्करांकडून जंगलाला आग?
By admin | Published: March 01, 2017 12:40 AM