आधी स्थानिकांना बांबू पुरवा : अशोक नागापुरे यांची टीकाचंद्रपूर : वनमंत्र्यांनी चंद्रपुरात दोन दिवसीय परिषद आयोजित करून बांबू उत्पादनासंदर्भात मर्गादर्शन करविले. मात्र या सर्व आयोजनात स्थानिक बांबू कारागिर वर्गाकडे त्यांचे दुर्लक्ष झाल्याने त्यांची गरज ते विसरले, अशी टीका जिल्हा काँग्रेस कमेटीचे अशोक नागापुरे यांनी केली आहे.या संदर्भात प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकातून अशोक नागापुरे यांनी स्थानिक बांबू कारागिर व्यावसायिकांची गरज व्यक्त केली. जिल्ह्यातील बुरड, आदिवासी या सोबतच बांबू कारागिर वर्गाला बांबू मिळणे कठीण होत चालले आहे. जंगलाचा ऱ्हास आणि बांबूची कमतरता यामुळे त्यांचा उद्योग थंडावत आहे. निस्तार हक्कातून मिळणाऱ्या बांबूतही गैरप्रकार होत असल्याने बांबू कारागिरांचे प्रश्न कायमच आहेत. चंद्रपुरातील दोन दिवसीय शिबिरात प्रात्यक्षिक करून दाखविलले बांबूकाम बाहेरून आणलेल्या बांबूचे होते. त्या प्रकारचा लवचिक बांबू चंद्रपुरात उपलब्ध नाही. या सोबतच कलात्मक आणि कलाकलसरीची बांबू उत्पादने करण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण घेण्याची बौद्धिक कुवतही सध्याच्या स्थानिक युवकात नाही. यामुळे या प्रशिक्षणापासून हा वर्ग वंचित राहील. याचा फायदा भांडवलदार वर्गच अधिक उचण्याची शक्यता असल्याने स्थानिक बांबू कारागिर उपेक्षित ठरण्याची शक्यता नागापुरे यांनी वर्तविली आहे. या चर्चासत्राच्या माध्यमातून बांबू हब निर्माण करणे, बांबू पार्क तयार करणे, एम्पोरियम उभारणे, बांबू उद्योगाला इंडस्ट्रिजचा दर्जा देणे या विषयावरील चर्चा स्वागतार्ह असली तरी, याचा फायदा स्थानिकांना न मिळता भांडवलदारच घेण्यची शक्यता आहे. देशातील पेपर मील बांबू अभावी बंद पडत असल्याने त्यातील कामगारांवर उपासमारीची पाळी येत आहे. सरकारने त्याचा विचार करावा, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
पारंपारिक बांबू व्यावसायिकांची गरज वनमंत्री विसरले
By admin | Published: July 08, 2015 1:22 AM