मामला पर्यटन वनक्षेत्रातील चोरगाव कुटी ते गोवरझरी कुटीपर्यंत जवळपास १२ किमी पायी चालत जंगल, वन्यजीव, पक्षी, पर्यावरण संतुलन याबद्दल विद्यार्थी, महिला, पुरुष, ग्रामस्थ यांच्या मनात प्रेम, आवड निर्माण होवून जनजागृती व्हावी याकरिता निसर्गानुभव घेण्यात आला. या शिबीरात उदय पटेल यांनी जंगल, वन्यजीव, पक्षी यांची आवश्यकता का असते याचे विस्तृत मार्गदर्शन केले. कोसनकर यांनी सहभागी सर्व सार्ड सदस्यांना येथील जंगल विविधता, वन्यजीव संवर्धन यांचे मार्गदर्शन केले. तसेच सार्ड संस्था अध्यक्ष भाविक येरगुडे यांनी विद्यार्थी, ग्रामस्थ यांची जंगल, वन्यजीव, पक्षी यांच्याबद्दल मनात आवड निर्माण झाली पाहिजे हाच उद्देश शिबीराद्वारे करण्याचा असतो असे सांगितले.
या शिबिरात चंद्रपूर, भद्रावती, बल्लारपूर, गडचांदूर या भागातून सार्ड संस्थेच्या ३० सभासदांनी सहभाग नोंदवून शिबीराचा लाभ घेतला. शिबीर यशस्वी करण्याकरिता आयोजक प्रमुख सुबोध कासुलकर यांनी कार्यक्रमाचे संचालन व आभार केले. सोबत संस्थेचे सल्लागार रवी पचारे, विलास माथनकर, संजय जावडे, नितीन डोंगरे, विश्वास उराडे, प्रा. राजेश पेशट्टीवार, अनुप येरणे, महेंद्र राळ, मंगेश लहामगे, प्रवीण राळे यांनी परिश्रम घेतले.