लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सर्वसामान्य नागरिक तसेच शेतकऱ्यांच्या वनविभागाशी संबंधित समस्यांचे प्राधान्याने निराकरण करावे. शेतकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये याची दक्षता वनाधिकाऱ्यांनी घ्यावी. अन्यथा कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. शनिवारी चंद्र्रपूर तालुक्यातील चिचपल्ली येथील वनविभागाशी संबंधित समस्या व तक्रारींचे निराकरण करण्यासाठी घेण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते.यावेळी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक एन. प्रवीण, उपवनसंरक्षक गुरू प्रसाद, उपविभागीय वनाधिकारी सोनकुसरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, रामपाल सिंग, जिल्हा परिषद सदस्य गौतम निमगडे, सरपंच श्रीकांत बावणे, पंचायत समितीचे उपसभापती चंद्रकांत धोडरे आदींची उपस्थिती होती.पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले, वनउपज गोळा करणे, हिरवा बांबु चिचपल्ली येथील नागरिकांना उपलब्ध करून देणे, याकरिता वनाधिकाºयांनी सकारात्मक कार्यवाही करावी. हा परिसर १०० टक्के आरोग्ययुक्त, एलपीजी गॅसयुक्त तसेच अंगणवाड्या आयएसओयुक्त करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे.मानव आणि वन्यजीव संघर्ष कमी करण्याकरिता गावाला सोलर फेन्सिंग करण्यासाठी शासनाकडून ९० टक्के अनुदान उपलब्ध करून दिल्या जाते. यात १० टक्के निधी ग्रामपंचायतींनी देणे बंधनकारक आहे. योग्य नियोजन केल्यास ही मागणीदेखील लवकरच पूर्णत्वाला येऊ शकते. गरम पाण्यासाठी लाकडे तोडण्यास जंगलात नागरिकांनी जाऊ नये. अधिकाऱ्यांनी गावातच सोलर वॉटर हिटरची व्यवस्था करून द्यावी. परिसरात रोजगार व स्वयंरोजगारासाठी सर्वेक्षण करून यासंदर्भातील आराखडा तयार करावा, असे निर्देशही पालकमंत्री मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना दिले.पुलांच्या बांधकामासाठी केंद्राकडून १०२.७८ कोटीपालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मागणी केल्याने केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील मोठ्या पुलांच्या बांधकामासाठी केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत १०२. ७८ कोटींचा निधी मंजुर केला आहे. केंद्र सरकारच्या रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्रालयाने ८ मार्च २०१९ रोजी राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र पाठवून सदर पुलांच्या बांधकामांसाठी केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत मंजुरी मिळाल्याची माहीती कळविली आहे. यात प्रामुख्याने मूल तालुक्यातील मोरवाही गावाजवळ उमा नदी पुलाच्या बांधकामासाठी २४. ३९ कोटी, डोंगरगाव गावाजवळ उमा नदीवर मोठ्या पुलाच्या बांधकामाला २१. ८३ कोटी तर विसापूर- कोलगाव रस्त्यावर वर्धा नदी पुलासाठी ५६.५६ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. पुलांच्या बांधकामामुळे मूल व बल्लारपूर तालुक्यातील दळणवळणाचा मोठा प्रश्न कायमचा सुटणार आहे. शिवाय तालुक्याच्या विकासाला गती येणार आहे.चिचपल्लीला मिळणार रूग्ण्वाहिकावनालगतच्या सर्व गावांच्या विकासाच्या विकासाकरिता एक ब्ल्यु प्रिंट तयार करण्यात यावी. यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लवकरच या कार्यवाहीला मूर्त रूप प्राप्त होईल. येत्या १५ दिवसात चिचपल्ली येथे नागरिकांच्या सोयीसाठी रूग्ण्वाहिका उपलब्ध करण्यात येईल, अशी ग्वाही ना. मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.
वनाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांचे तात्काळ निराकरण करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 11:00 PM
सर्वसामान्य नागरिक तसेच शेतकऱ्यांच्या वनविभागाशी संबंधित समस्यांचे प्राधान्याने निराकरण करावे. शेतकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये याची दक्षता वनाधिकाऱ्यांनी घ्यावी. अन्यथा कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश :अडवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई