वनविभागातील क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांना शासन खर्चाने गणवेश पुरविला जातो. वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक, क्षेत्र सर्वेक्षक आणि सर्वेक्षक संवर्गातील अधिकारी, कर्मचारी यांना गणवेश व त्यासोबतच याबाबीसाठी वार्षिक पाच हजार १६७ दराने भत्ता मंजूर केलेला आहे. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अधिकारी व कर्मचारी हे शासकीय गणवेश परिधान करीत असतील, याची खात्री करून घ्यावी. प्रादेशिक वनपरिक्षेत्र स्तरावर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी बैठक आयोजित करून वनसंरक्षण कार्य आयोजनासंबंधी कामाचा व इतर कामाचा आढावा घेणे, गणवेश परिधान करणारे अधीनस्थ वनसंरक्षक, वनपाल यांची त्यादिवशी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक यांनी परेड घेणे आवश्यक आहे. असे आदेश प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी दोन वर्षापूर्वी निर्गमित केले. वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या कार्यालयात जागा उपलब्ध नसेल तर योग्य ठिकाणी परेड आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच दर महिन्यात ही परेड घ्यावी, असे नमूद करण्यात आले आहे. असे असताना प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बैठक घेतली जाते. परंतु परेड ही कागदोपत्री दाखविली जात असल्याचे समजते.
वनक्षेत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांची दोन वर्षापासून परेडच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 4:30 AM