मध्य चांदा वन विभाग अंतर्गत बल्लारपूर, कोठारी, धाबा, पोंभुर्णा, राजुरा, वनसडी, जिवती, विरुर या वन परिक्षेत्रात सुमारे अडीचशे कर्मचारी कार्यरत आहेत. कोरोना काळातही वरिष्ठांचे मार्गदर्शनात नियमित वने व वन संरक्षणाची कामे करीत आहेत. परंतु, मागील तीन महिन्यांपासून या क्षेत्रीय वन कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन थकले आहे. याबाबत हे क्षेत्रीय कर्मचारी संबंधित कार्यालयीन लिपिकाशी संपर्क करून वेतनाबाबत विचारणा करीत आहे. परंतु, अजूनपर्यंत नेमके कोणत्या कारणास्तव वेतन मिळू शकले नाही, हे त्यांना समजू शकले नाही. यापैकी बरेच वन कर्मचारी यांनी गृह कर्ज, वाहन कर्ज, शिक्षण कर्ज व जीवन विमा हप्ता काढलेले आहेत. नियमित वेतन मिळत नसल्याने घर खर्च भागविणे व कर्जाचे हप्ते कसे फेडायचे, हा गंभीर प्रश्न पडला आहे.
तीन महिन्यांपासून वन कर्मचारी वेतनापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 4:33 AM