श्वान पथक घरातच फिरले : घराचे व कपाटाचे कुलूप शाबुतवरोरा : घरातील कपाट घरातच ठेवलेल्या चाबीने काढून कपाटातील २५ तोळे सोने व १९ हजार रुपये रोख चोरुन नेल्याची घटना घडली. ही घटना आज शुक्रवारी उघडकीस आली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. वरोरा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.शहरातील माढेळी रोड लगतच्या शिवाजी वॉर्डातील गजानन कुरेकार हे ९ एप्रिल रोजी सायंकाळी आपल्या नातेवाईकाच्या मुलाच्या नामकरण सोहळ्याकरिता सहकुटुंब शेंबळ येथे गेले होते. ९ एप्रिलला रात्री ते घरी परत आले. १० एप्रिल रोजी नव्याने बांधकाम सुरू असलेल्या घराच्या कामावर पाणी मारण्याकरिता जाण्यापूर्वी गजानन कुरेकार यांनी आपल्या बोटातील सोन्याच्या अंगठ्या पत्नी माया यांच्याकडे कपाटात ठेवण्यासाठी दिल्या. समारंभाकरिता सोने अंगावर असल्याने तेही कपाटात ठेवण्यासाठी माया कुरेकार स्वत: जवळील दागिने व पतीच्या अंगठ्या ठेवण्याकरिता कपाट उघडले. मात्र यावेळी कपाटातील स्टीलच्या डब्ब्यात ठेवलेले सोने आढळून आले नाही. सोने ठेवलेल्या डब्ब्याजवळच ठेवलेले १९ हजार रुपयेदेखील दिसून आले नाही. त्यामुळे कपाटाची तपासणी केली असता इतरत्र ठेवलेले दागिने व रोख सुरक्षित असल्याचे दिसून आले. कपाटाची व घराच्या दाराची कुठेही तोडफोड करण्यात आली नव्हती. परंतु २५ तोळे सोने व १९ हजार रुपये मात्र लंपास झाले. कुरेकार यांच्या कपाटाची चाबी नेहमी एका ठिकाणीच ठेवली जात होती. चोरी गेलेल्या सोन्यामध्ये राणीहार, चपलाकंठी, मंगळसूत्र, गोफ, बांगड्या, अंगठी, डोरले या दागिन्याचा समावेश असून १९ हजार रुपयेही लंपास करण्यात आले आहे. याबाबतच्या पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)ठसे तज्ज्ञ घटनास्थळीवरोरा पोलिसांनी घटनास्थळी ठसे तज्ञांना पाचारण केले. परंतु ज्या चाबीने कपाट उघडले ती चाबी व कपाट घरातील कुटुंबियांनी चोरीनंतर हाताळल्याने ठसे तज्ञांकडून कोणता अहवाल येतो, यावरच पुढील तपास अवलंबून असल्याचे पोलिसांनी सांगितले.श्वान पथक घरातच फिरलेवरोरा पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण केले. परंतु घरातील बहुतांश कुटुंबियांनी कपाट, चाबी वारंवार हाताळल्याने श्वान पथकही घरातल्या घरातच घुटमळले. श्वान पथकही चोरट्याचा मार्ग दाखवू शकले नाही.
वरोऱ्यात २५ तोळे सोन्याची धाडसी चोरी
By admin | Published: April 11, 2015 1:00 AM