शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

तपासाची सूत्रे आता एसडीपीओंकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 11:56 PM

येथील काजल मृत्यू प्रकरण आता गंभीर झाले आहे. काजलच्या वडिलांसह आता विविध पक्षांचे पदाधिकारी, माना समाज व इतर नागरिकही प्रकरणाचा छडा लावण्याची मागणी करू लागले आहेत.

ठळक मुद्देराजकीय पक्षही सरसावले : संशय व्यक्तींची चौकशी करा

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : येथील काजल मृत्यू प्रकरण आता गंभीर झाले आहे. काजलच्या वडिलांसह आता विविध पक्षांचे पदाधिकारी, माना समाज व इतर नागरिकही प्रकरणाचा छडा लावण्याची मागणी करू लागले आहेत. ‘लोकमत’ सातत्याने या प्रकरणाकडे लक्ष वेधत आहे. त्यामुळे अखेर खुद्द उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनाच या प्रकरणाची सूत्रे आपल्या हाती घ्यावी लागली आहे.काजल मृत्यू प्रकरणात अनेक प्रश्नांची उकल पोलिसांकडून होऊ शकली नाही. काजलची आत्महत्या की घातपात, आत्महत्या असेल तर त्याला कारणीभूत कोण, काजल मृत्यूच्या तीन दिवसांपूर्वी घरातून निघून गेल्यानंतर कुठे गेली होती, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. लोकमतने सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर रविवारी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांनी मृत काजलचे मोठे वडील काशीनाथ हनवते व त्यांचे कुटुंब यांच्याशी बंदद्वार चर्चा केली. यावेळी माना समाजाचे तालुका अध्यक्ष हरीभाऊ बारेकर, लोनवाहीचे ग्रा.पं. सदस्य रवी सावकुडे, काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष अरुण कोलते यांच्या समक्ष त्यांचे बयाण नोंदवण्यात आले. मागील चार दिवसांपासून ‘लोकमत’ने हे प्रकरण उचलून धरल्याने शहरात ठिकठिकाणी आता याच प्रकरणाची चर्चा होत आहे. शिवसेना-भाजपा-मनसे-काँग्रेस या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी हनवते कुटुंबियांच्या घरी जावून त्यांचे सांत्वन करीत ‘आम्ही आपल्या पाठीशी आहोत, असे सांगितले. विशेष म्हणजे, प्रारंभी पोलीसच हे प्रकरण दडपण्याच्या मनस्थितीत होते, असे खुद एका पोलीस कर्मचाऱ्यांनेच ‘लोकमत’ ला सांगितले.पुन्हा शवविच्छेदन करा - मागणीकाजलच्या शवविच्छेदनावर संशय व्यक्त करीत काशीनाथ हनवते यांनी तिचे पुन्हा शवविच्छेदन करण्याची मागणी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे केली. तसेच या प्रकरणात ज्या मुला-मुलींचे नावे समोर येत आहेत, त्यांना बोलावून चौकशी करण्यात यावी. तपासाला गती द्यावी, पोलिसांनी सहकार्य करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.