शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

आजी-माजी आमदारांची पाण्यासाठी धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 11:44 PM

गोसेखुर्द धरणाचे पाणी शेतकºयांना उपलब्ध व्हावे, यासाठी आ. विजय वडेट्टीवार व माजी आ. प्रा. अतुल देशकर यांनी गराडी नाल्याकडे धाव घेवून गोसेखुर्दचे पाणी ....

ठळक मुद्देगोसेखुर्द धरणाचे पाणी सोडले : शेतकºयांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : गोसेखुर्द धरणाचे पाणी शेतकºयांना उपलब्ध व्हावे, यासाठी आ. विजय वडेट्टीवार व माजी आ. प्रा. अतुल देशकर यांनी गराडी नाल्याकडे धाव घेवून गोसेखुर्दचे पाणी शेतकºयांना उपलब्ध करण्याच्या सूचना अधिकाºयांना दिल्या. त्यानुसार पाणी सोडण्यात आले असून शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.ब्रह्मपुरी तालुक्यात गोसेखुर्द धरण शेतकºयांसाठी वरदान ठरणारे आहे. परंतु, काम अपूर्ण असल्याने पाणी सोडणे बंद आहे. विशेषत: गराडी नाल्याजवळ कालवा खचल्याने त्याचे काम सुरू होते. परंतु, ब्रह्मपुरी तालुक्यात अत्यल्प पावसामुळे परिसरातील शेतकºयांची रोवणी शिल्लक आहेत. तर रोवणी व आवत्या झालेले पीक पाण्याअभावी करपायला सुरुवात झाली आहे. शेतकºयांना गोसेखुर्द धरणाचे पाणी यापूर्वी शेतीला मिळाले असते, तर शेतकºयांची पूर्णत: रोवणी झाली असती. मात्र दुधवाहीजवळ गराडी नाल्यावर पूल व धरण खचल्याने गेल्या वर्षभरापासून पाणी सोडणे बंद केले होते. ही बाब आजीृ-माजी आमदारांच्या लक्षात आली. दरम्यान आमदार वडेट्टीवार यांनी गोसेखुर्दचे पाणी सोडण्याविषयी ३० आॅगष्टपर्यंत संबंधित विभागाला अल्टीमेटम् दिला होता. तर माजी आमदार देशकर यांनी संबंधित विभागाला काम पूर्ण करून पाणी सोडण्याविषयी बाध्य केले. या साºया प्रकारानंतर गुरुवारी गराडी नाल्यावरुन पुढे आसोलामेंढा तलावापर्यंत पाणी सोडण्यात आले. व परिसरातील शेतकºयांसाठी आजी-माजी आमदारांनी आपआपल्या परीने काम पूर्णत्वास नेले. त्यामुळे संबंधित विभागाने गुरुवारी पाणी सोडण्याविषयी सूचना करताच दोन्ही आजी-माजी आमदारांनी आळीपाळीने कार्यकर्त्यासह गराडी नाल्यावर जावून पाहणी करून समाधान व्यक्त केले. यावेळी सुरुवातीला माजी आमदार प्रा. अतुल देशकर, नानाजी तूपट, पं.स. सदस्य रामलाल दोनाडकर, पं.स. उपसभापती विलास उरकुडे, राजेश्वर मगरे, राहुल बारसागडे व त्यानंतर आ. विजय वडेट्टीवार, तालुका अध्यक्ष खेमराज तिडके, जि.प. सदस्य राजेश कांबळे, जि.प. सदस्य प्रमोद चिमूरकर, स्मिता पारधी, वैशाली शेरकी पं.स. सदस्य थानेश्वर कायरकर, रश्मी पेशने, प्रतिभा फुलझेले, बाळू राऊत, विलास निखार, डॉ. सतीश कावळे अधिकारी व अभियंता उपस्थित होते.