लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी भेट देवून कोरोना आजरासंबंधीच्या व्यवस्थेची पाहणी केली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना रुग्णांसाठी करण्यात आलेली व्यवस्था बघून समाधान व्यक्त केले.कोरोनाने सगळीकडे मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. जिल्ह्यात सद्या एकही रुग्ण नसला तरीही शासकीय रुग्णालयात कोरोना रुग्ण व संशयीतांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. याबाबत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी अधिष्ठाता व शल्य चिकित्सक यांच्याशी चर्चा करुन त्यांच्या नियोजनाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोनाला न घाबरता काळजी घ्यावी, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, स्वच्छ हात धुवावे, नाकाल रुमाल बांधावी तसेच आजराबाबत शंका असल्यास ०७१७२-२५३२७५, ०२०२६१२७३९४, १०४ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.कोरोनाबाबत जिल्हा प्रशासनाने चांगली व्यवस्था केली असून काही खासगी रुग्णालयातही बेड आरक्षित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे.रुग्णांना वेकोलि करणार मदतवेकोलिचे अध्यक्ष व व्यवस्थापकी संचालक नागपूर तसेच क्षेत्रीय महाप्रबंधक वेकोलि चंद्रपूर यांच्या माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांनी दुरध्वनीवर संपर्क करुन जिल्ह्यातील सर्व वेकोलि हॉस्पिटल कोरोना रुग्णांसाठी सोईसुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार वेकोलि प्रशासनाने मदत करण्याचे आश्वासन दिल्याचे अहीर यांनी प्रसिद्धीपत्रकातून कळविले आहे
माजी केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी घेतला कोरोनाबाबत आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 6:00 AM
कोरोनाने सगळीकडे मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. जिल्ह्यात सद्या एकही रुग्ण नसला तरीही शासकीय रुग्णालयात कोरोना रुग्ण व संशयीतांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. याबाबत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी अधिष्ठाता व शल्य चिकित्सक यांच्याशी चर्चा करुन त्यांच्या नियोजनाबाबत समाधान व्यक्त केले.
ठळक मुद्देकोरोना रूग्णासाठी विशेष व्यवस्था। अधिष्ठाता व शल्यचिकित्सकांशी चर्चा