शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: तावडे आलेल्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
2
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
5
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
6
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
7
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
8
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
9
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
10
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
11
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
12
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
13
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
14
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
15
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
18
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
19
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
20
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल

ज्येष्ठ असतानाही कनिष्ठांकडे सूत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 4:27 AM

चंद्रपूर : जिल्ह्यातील सर्वच्या सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे या पदांचा प्रभार देताना त्या- त्या तालुक्यातील ज्येष्ठ शिक्षण ...

चंद्रपूर : जिल्ह्यातील सर्वच्या सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे या पदांचा प्रभार देताना त्या- त्या तालुक्यातील ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांकडे प्रभार देणे अपेक्षित असतानाही बहुतांश तालुक्यांत अधिकाऱ्यांच्या मर्जीतील दुसऱ्याच तालुक्यातील विस्तार अधिकाऱ्यांकडे प्रभार देण्यात आला आहे. तर काही तालुक्यांत सक्षम नसतानाही शालेय पोषण आहार अधिकाऱ्यांकडे गटशिक्षणाधिकाऱ्यांचा पदभार देऊन शिक्षण विभाग मोकळा झाला आहे. त्यामुळे अनेक ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांवर अन्याय होत आहे. विशेष म्हणजे, केंद्रप्रमुखाच्या रिक्त पदाबाबतही असाच गोंधळ बघायला मिळत आहे.

मागील काही वर्षांमध्ये जिल्ह्यात शिक्षण विभागाने चांगली कामगिरी केली असली तरी गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुखांचा प्रभार देताना मोठ्या प्रमाणात वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करीत असल्यामुळे कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. यासंदर्भात बहुतांश तालुक्यांतील कर्मचाऱ्यांमध्ये सध्या नाराजीचा सूर असल्याचे बघायला मिळत आहे. गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या रिक्त पदावर त्याच तालुक्यातील ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांकडे पदभार देणे अपेक्षित आहे. मात्र जिल्ह्यात काही तालुक्यांत ज्येष्ठांना वगळून कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना तसेच तालुक्यातील सोडून दुसऱ्याच तालुक्यातील अधिकाऱ्यांवर पदभार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये अधिकाऱ्यांबाबत नाराजी दिसून येत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

बाॅक्स

शालेय पोषण आहार अधिकाऱ्यांकडे प्रभार

जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये गटशिक्षणाधिकाऱ्यांचा प्रभार शालेय पोषण आहारच्या कक्ष अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. विशेष म्हणजे, गटशिक्षणाधिकाऱ्यांचा प्रभार सोपविताना ज्येष्ठ तसेच बीएड असणे गरजेचे आहे. त्या-त्या तालुक्यात सक्षम अधिकारी असतानाही डावलण्यात आले आहे. त्यामुळे नेमका उद्देश काय, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

बाॅक्स

वरोरामध्ये झाला होता गोंधळ

वरोरा येथील गटशिक्षणाधिऱ्यांचा पदभार देताना दुसऱ्या तालुक्यातील कनिष्ठ अधिकाऱ्याकडे प्रभार देण्यात आला होता. यासंदर्भात काहींनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली तसेच पदाधिकाऱ्यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर शिक्षण विभागाला आपली चूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांकडे प्रभार सोपविला.

बाॅक्स

केंद्रप्रमुखांचा पदभारही इतरांकडे

एखाद्या केंद्रातील केंद्रप्रमुखांचे पद रिक्त झाले असेल तर प्रभार देताना शेजारच्या केंद्रप्रमुखांकडे किंवा केंद्र शाळेतील ज्येष्ठ विषय शिक्षकाकडे पदभार द्यावा लागतो. मात्र जिल्ह्यात असे न करता काही कनिष्ठ असलेल्या विषय शिक्षकांकडे तसेच केवळ दहावी शिक्षण असलेल्या शिक्षकाकडे केंद्रप्रमुखाचा पदभार देण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे.

बाॅक्स

असे आहे प्रभारी

भद्रावती तालुक्यात शिक्षण विस्तार अधिकारी कार्यरत असतानादेखील या तालुक्यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांचा प्रभार राजुरा पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांकडे, चंद्रपूरच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांकडे गोंडपिपरीचा प्रभार, नागभीडच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांकडे सिंदेवाहीचा प्रभार, नागभीड आणि ब्रह्मपुरी तालुक्यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांचा प्रभार शालेय पोषण विभागाच्या अधीक्षकाकडे, कोरपना तालुक्यातील शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांकडे वरोरा तालुक्यातील शालेय पोषण विभागाचा प्रभार, चंद्रपूर पंचायत समितीमध्ये ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना डावलून कनिष्ठ विस्तार अधिकाऱ्यांकडे गटशिक्षणाधिकाऱ्यांचा प्रभार, बल्हारपूर पंचायत समितीमध्येसुद्धा ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांकडील प्रभार काढून मर्जीतील कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. दरम्यान, वरोरा, भद्रावती, चिमूर आदी तालुक्यांत कनिष्ठ विषय शिक्षकांकडे केंद्रप्रमुखाचा प्रभार तर काही ठिकाणी साहाय्यक शिक्षकांकडे प्रभार देण्यात आला आहे.