लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : बिकली शिवारात शिकारी सक्रिय झाले आहेत. मात्र शिकाऱ्यांंनी मांडलेल्या विषाक्त गोळ्यांनी जंगली प्राण्यांऐवजी चार पाळीव जनावरेच ठार झाली.नागभीड तालुका जंगलव्याप्त असल्याने जंगली प्राणीही मोठ्या प्रमाणावर आहेत. परिणामी या प्राण्यांची शिकार करणारे शिकारीही सक्रिय आहेत. अशाच शिकाºयांनी बिकली परिसरातील शिवारात शिकार करण्याच्या उद्देशाने विषाक्त गोळे ठेवले. मात्र हे गोळे जंगली प्राण्यांऐवजी पाळीव प्राण्यांनी खाल्ले. यात दोन गायी, एक गोरी व एक रेडा अशी चार जनावरे ठार झाल्याची माहिती आहे. याशिवाय एक म्हैस बाधीत आहे.गावकºयांंनी घडलेल्या प्रकाराची तक्रार वनविभागाकडे मंगळवारी केल्यानंतर वनविभागाने तातडीने घटनास्थळ गाठून चौकशी केली असता गव्हाच्या पिठात थिमेंट मिसळलेले १४ गोळे आढळून आले. हे गोळे वनविभागाने नष्ट केले आहेत. पुढील तपास वनविभाग करीत आहे.
विषाक्त गोळ्यामुळे चार जनावरे दगावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 10:43 PM
बिकली शिवारात शिकारी सक्रिय झाले आहेत. मात्र शिकाऱ्यांंनी मांडलेल्या विषाक्त गोळ्यांनी जंगली प्राण्यांऐवजी चार पाळीव जनावरेच ठार झाली.
ठळक मुद्देवन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी ठेवले होते गोळे