लोकमत न्यूज नेटवर्कप्रवीण खिरटकरचंद्रपूर : शासनाने नाफेडमार्फत हमी भावाने चना व तूर खरेदी करणे बंद केले. त्यामुळे राज्यातील चार लाख १० हजार ६८४ शेतकरी नाफेडकडे तूर व चना विक्रीची नोंद करुन प्रतीक्षेत आहे. यामध्ये या शेतकऱ्यांनी बाजार समिती नोंदणीकृत व्यापाऱ्यास बाजार भावाने चना व तूर विक्री केल्यास शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने प्रति क्विंटल एक हजार रुपये अनुदान दिले जणार आहे.महाराष्ट्रात शासनाने नाफेडमार्फत हमी भावाने तूर व चना खरेदी सुरु केली होती. याकरिता शेतकऱ्यांना नोंदणी करणे बंधनकारक होते. नोंदणी झाल्यानंतर क्रमाक्रमाने शेतकऱ्यांना बोलाविले जात होते. त्यामध्ये राज्यात नाफेडने दोन लाख ६५ हजार ८५४ शेतकऱ्यांची तूर तर ९९ हजार १६१ शेतकऱ्यांच्या चना हमी भावाने खरेदी केला. चना व तूर तीन लाख ६५ हजार १५ क्विंटल खरेदी केली. तुरीची खरेदी मोठ्या प्रमाणात झाल्याने तूर ठेवणारी गोदामे तुडूंब भरली. भाडे तत्वावरील गोदामेही हाऊसफूल झाल्याने तूर व चना ठेवण्याकरिता जागा नाही व पावसाचा हंगाम सुरु झाल्याने शासनाने चना व तूर खरेदीला मुदतवाढ दिली नाही. त्यामुळे नोंदणी केलेले शेतकरी चिंतेत सापडले होते. शासनाने नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देत बाजार समितीने अधिकृत केलेल्या व्यापाऱ्यास चना व तूर विकण्यास मोकळीक दिली असून व्यापाऱ्यास चना व तूर विकल्या नंतर व्यापाऱ्याकडील नोंदणी केलेली पावती आदी दस्तऐवज बाजार समितीकडे जमा केल्यानंतर शासन प्रति क्विंटल एक हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहे.हमी भाव मात्र नाहीशेतकऱ्यांना अनुदान दहा क्विंटल प्रती हेक्टर असून ही मर्यादा जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना मुदतीत एसएमएस पाठवता आला नाही, असे शेतकरी अनुदानास पात्र ठरविण्यात आले आहे. अनुदानामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी हमी भाव मात्र शेतकऱ्यांना मिळणार नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तूर व चना विक्रीची नोंदणी करुनही हमी भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट कायम राहत असल्याने मानले जात.एसएमएसने केला घातचना व तूर विक्रीकरिता नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना तारीख निश्चित करुन एसएमएस पाठविण्यात आले. अनेक शेतकऱ्यांना एसएमएस समजले नाही. त्यामुळे शेतकरी नोंदणी करुनही अनभिज्ञ राहिले. अशा शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा एसएमएसने घात केल्याचे दिसून येत आहे.
राज्यातील चार लाख दहा हजार ६८४ शेतकऱ्यांना अनुदान मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 2:41 PM
शेतकऱ्यांनी बाजार समिती नोंदणीकृत व्यापाऱ्यास बाजार भावाने चना व तूर विक्री केल्यास शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने प्रति क्विंटल एक हजार रुपये अनुदान दिले जणार आहे.
ठळक मुद्देहमी भाव मात्र नाही