लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अधीक्षक सागर धोमकर यांच्या मार्गदर्शन दोन वेगवेगळ्या कारवाया करुन एक दुचाकी व एक चारचाकी वाहनासह चार लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी एकास अटक करण्यात आली. ही कारवाई सोमवारी मध्यरात्री करण्यात आली.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक गस्तीवर असताना बल्लारपूर-चंद्रपूर बायपास रोडवरील डब्ल्यूसीएलच्या रेती बंकर जवळ एक वाहन थांबलेले दिसले. या वाहनाची तपासणी केली असता, देशी दारूचे १८ बॉक्स आढळून आले. यावेळी एकास अटक करण्यात आली.मंगळवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास चोराला ते चंद्रपूरमार्गे एका दुचाकी वाहनाद्वारे दारुची वाहतूक होत असल्याच्या माहितीच्या आधारावर चोराला मार्गावर शांतीधाम जवळ सदर वाहन थांबवून वाहनाची तपासणी केली असता, वाहनाच्या डिक्कीमध्ये व समोर ठेवलेल्या पॉकेटमध्ये १८० मिलीच्या ६२ बॉटल देशी दारु आढळून आली. यावेळी वाहनचालकास अटक करण्यात आली.दोन्ही कारवाईत एक दुचाकी व एक चारचाकी वाहन असा एकूण चार लाख २४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक ए. डब्ल्यू क्षीरसागर, किशोर पेदूजवार, जगदीश मस्के, संदीप राठोड आदींनी केली.मागील काही दिवसांपूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली होती. पुन्हा कारवाईने केल्याने दारुविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
चार लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 10:36 PM
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अधीक्षक सागर धोमकर यांच्या मार्गदर्शन दोन वेगवेगळ्या कारवाया करुन एक दुचाकी व एक चारचाकी वाहनासह चार लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी एकास अटक करण्यात आली. ही कारवाई सोमवारी मध्यरात्री करण्यात आली.
ठळक मुद्देदोघांना अटक : राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई