लोकमत न्यूज नेटवर्कवासेरा : सिंदेवाही तालुक्यातील रामाळा-वाकल या दोन किमी रस्त्याचे डांबरीकरण चार महिन्यातच उखडल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रामाळा-वाकल दोन किमी रस्त्याचे बांधकाम करण्यात आले होते. शिवाय डांबरीकरणाचेही काम पूर्ण झाले. या बांधकामावर सुमारे २६ लाखांचा निधी खर्च झाल्याचे बोलल्या जात आहे. मात्र, चार महिन्यांत रस्त्यावरील डांबर उखडून मोठे खड्डे पडल्याने यामध्ये गैरव्यवहार झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या रस्त्यावरुन ये-जा करणे नागरिकांना अवघड झाले आहे.रामाळा-वाकल रस्त्यावरुन वाकल रेतीघाटावरुन रेतीची वाहतूक होत होती. एक महिन्यापूर्वी वाकल येथील नागरिकांनी रेतीचे सहा ट्रक प्रशासनाच्या स्वाधीन केले होते. परंतु, या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल विभागाकडे अवैध वाहतुकीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे ही अवस्था झाली, असा आरोप ग्रामस्थ करत आहेत.रामाळा-वाकल रस्त्यावर ये-जा करणे कठीण झाल्याने शेतकºयांची अनेक कामे अडली. यासंदर्भात संबंधित विभागाकडे तक्रार करूनही चौकशी झाली नाही. त्यामुळे रस्ता बांधकामात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
चार महिन्यांत डांबर उखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 12:11 AM
सिंदेवाही तालुक्यातील रामाळा-वाकल या दोन किमी रस्त्याचे डांबरीकरण चार महिन्यातच उखडल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
ठळक मुद्देनिकृष्ट बांधकाम : रामाळा-वाकल रस्त्याविषयी संताप