संबंधित शिक्षकाने आत्महत्या का केली, यासंदर्भात शहरात उलटसुलट चर्चा सुरू होती. मृत शिक्षकाला १४ मे २०२० च्या आदेशानुसार गैरशिस्त तसेच गैरवर्तणुकीसंदर्भात जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करण्यात आले होते. नुकतीच त्यांची सेवा जि.प. उच्च प्राथमिक शाळा इंदिरानगर पंचायत समिती जिवती येथे पुनर्स्थापित करण्यात येऊन १६ मार्च २०२१ ला मध्यान्हापूर्वी कुडेसावली येथून भारमुक्त करण्यात आले होते.
ब्रम्हपुरी पोलिसांना मृत शिक्षकाने तलावाच्या काठावर काढून ठेवलेल्या कपड्यात एक चिठ्ठी आढळली. त्यात गटशिक्षणाधिकारी प्रमोद नाट, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी उपलंचीवार, मुख्याध्यापक बतके, कुडेसावली येथील गुरनुले यांची नावे नमूद आहे. सापडलेल्या चिठ्ठीत लिहिलेल्या नावावरून ब्रम्हपुरी पोलिसांनी कलम ३०६ तसेच अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ माजली आहे.