लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : औद्योगिक विश्वात पर्यावरणासंबंधी उत्तम कामगिरी करणाऱ्या चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रास राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘फोर स्टॉर रेटिंग’ देऊन गौरव केला आहे.चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रात सद्या सात संच असून विद्युत निर्मिती क्षमता २९२० मेगावॅट आहे. संच क्र. ३ व ४ संच २१० मेगावॅट आणि ५ ते ९ हे संच ५०० मेगावॅट क्षमतेचे आहेत. संचाच्या धुरांड्यामधून धूर कमी निघावा, याकरिता संच क्र. ३ ते ९ मध्ये प्रत्येक संचाला ईएसपी हे संयंत्र बसविण्यात आले आहे. तसेच संच क्र. ३ ते ७ मध्ये इएसपी सोबतच अद्ययावत अमोनिया फ्लु गॅस कंडिशनिंग हे संयंत्र बसविण्यात आले आहे. त्यामुळे इएसपीमधून जास्त प्रमाणात राख बाहेर काढण्यात येते. संच क्र. ८ व ९ ची एसपीएम डिझाईनची क्षमता मोठी आहे. धुरांड्यातील निघणारी राख कमी प्रमाणात म्हणजेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नेमून दिलेल्या मर्यादेतच राहते.चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रातील धुरांड्यातील राख बाहेर जाऊ नये व राखेचे प्रमाण कमी ठेवण्याकरिता प्रत्येक संचाच्या इएसपी व विविध प्रदूषण नियंत्रण प्रणालीचे काम संबंधित विभागातील अभियंते, रसायन शास्त्रज्ञ व तंत्रज्ञाकडे सकारात्मकपणे व नियमित केले जात आहे. परिणामी, प्रदुषणाला आळा बसला आहे.औष्णिक केंदातून वेगवेगळ्या प्रक्रियेतून जे पाणी निघते. ते जलनि:सारण केंद्रात (इफलुएन्ट ट्रिटमेंड प्लॅन्ट) प्रक्रिया करून पुढे जाते. हे प्रक्रिया केलेले पाणी राख वाहून नेण्याकरिता उपयोगात आणले जाते. विज केंद्रात वेगवेगळ्या क्षमतेचे चार जलनि:सारण केंद्र बसविण्यात आले आहे. त्यामुळे वीज केंद्रातील कोणत्याही प्र्रकारचे दूषित पाणी इरई नदीच्या पात्रामध्ये जाणार नाही, याची संपूर्ण दक्षता घेण्यात आली आहे. पर्यावरणाचे संतुलन व संवर्धन करण्याच्या दृष्टीने मुख्य अभियंता जयंत बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर औष्णिक केंद्रातील संबंधित सर्व विभाग उत्तमरित्या कार्य करीत आहेत. त्यामुळे प्रदुषणाचा प्रश्न मिटला. विजेचे उत्पादन करीत असताना पर्यावरणाकडेही विशेष लक्ष दिले जात आहे. त्यासाठी अधिकारी आणि कर्मचाºयांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. वर्षभर विविध उपक्रम सुरू असतात. केंद्रातर्फे विविध योजना राबविण्यात येत आहे. चंद्रपूर शहराचे पर्यावरण संतुलन व नियंत्रणासाठी योगदान दिल्याने हे मानांकन मिळाल्याचे मुख्य अभियंता जयंत बोबडे यांनी म्हटले आहे.
महा औष्णिक केंद्राला ‘फोर स्टॉर रेटिंग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 10:44 PM
लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : औद्योगिक विश्वात पर्यावरणासंबंधी उत्तम कामगिरी करणाऱ्या चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रास राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘फोर स्टॉर रेटिंग’ देऊन गौरव केला आहे.चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रात सद्या सात संच असून विद्युत निर्मिती क्षमता २९२० मेगावॅट आहे. संच क्र. ३ व ४ संच २१० मेगावॅट आणि ५ ते ९ हे ...
ठळक मुद्देप्रदूषणाला आळा : राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे सन्मानित