शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

चार दाणे चिमण्या-पाखरांना देऊ या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 11:15 PM

लग्न म्हटले की, कुणाच्याही तोंडून सहज निघतात, चार अक्षता टाकून येतो. या चार अक्षता पाहता पाहता चार किलोच्या होतात. हे कुणाच्या मनात येत नसले तरी त्याकडे मात्र, दुर्लक्ष केले जाते. वाढत्या महागाईमुळे सामान्यांना धान्य मिळणे कठिण झाले आहे. यामुळे येणाऱ्या युवा पिढीवर याच चार अक्षतांचे दाणे वाचविण्याची वेळ आली आहे. यावर दाण्यातून कुणाच्या दोन वेळेच्या जेवणची सोय होऊ शकते, हे विसरता कामा नये.

ठळक मुद्देलग्नमंडपात तांदळाचा खर्च : पारंपरिक पद्धतीला फाटा देण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लग्न म्हटले की, कुणाच्याही तोंडून सहज निघतात, चार अक्षता टाकून येतो. या चार अक्षता पाहता पाहता चार किलोच्या होतात. हे कुणाच्या मनात येत नसले तरी त्याकडे मात्र, दुर्लक्ष केले जाते. वाढत्या महागाईमुळे सामान्यांना धान्य मिळणे कठिण झाले आहे. यामुळे येणाऱ्या युवा पिढीवर याच चार अक्षतांचे दाणे वाचविण्याची वेळ आली आहे. यावर दाण्यातून कुणाच्या दोन वेळेच्या जेवणची सोय होऊ शकते, हे विसरता कामा नये.लग्न वधू-वरांच्या डोक्यावर अक्षता टाकण्याची पध्दत अनादी काळापासून सुरू आहे. यात मोठ्या प्रमाणात तांदूळ आणि ज्वारी या धान्याची नासाडी होते. लग्न लावताना हातात अक्षता म्हणून तांदळाला कुंकू व ज्वारीला हळद लावण्यात येते. आजघडीला अक्षता वाटण्याच्या पध्दती बदललेल्या आहेत. मंडपात प्रवेश होताच प्लास्टिकच्या छोट्या पाकिटात तांदळाची व दुसऱ्या पाकिटात ज्वारीची अक्षता हातात पडते. लग्न समारंभ आटोपल्यानंतर मंडपात कुठ प्लास्टिकची रिकामी पाकिटे तर कुठे रंगबेरंगी तांदळाचा सडा दिसून येतो. मंडपात असणाऱ्यांचे याकडे लक्ष जाते. मात्र कुण्या गरजवंताची चार मुले जगू शकतील. याचा विचार कुणाच्याच मनात येत नाही.लग्न समारंभ दिवसेंदिवस प्रतिष्ठेत सोहळा ठरला आहे. या प्रतिष्ठेमुळे धान्य पायदळी तुडवल्या जात आहे. मात्र, त्यात बदल करण्याची इच्छा कुणाच्याही मनात येत नाही. जीवनाचे वास्तव सांगणाºया राष्टÑसंतानी या गोष्टीचा उलगडा तेव्हाच केला होता. त्यांनी सांगितलेले वास्तव अनेकांना कळते असले, तरी अंमलबजावणी मात्र कुणीही करीत नसल्याचेच दिसून येते आहे.आतातरी तांदळाचे महत्व लक्षात घेता पूरातन रूढी परपंरेचा पगडा मिरविणे सोडून तांदळाची नासाडी थांबविण्यासाठी प्रत्येकांनी पुढाकार घेतल्यास यावर आळा बसू शकेल. यासाठी जनजागृतीची गरज आहे.रूढी झाली पध्दतलग्नात वधू- वरांच्या डोक्यावरत अक्षता टाकतात. ही पध्दत पुरातन आहे. अक्षता हे पुर्णतेचे लक्षण आहे. धान्यात तांदूळ हे संपन्नतेचे लक्षण असल्यामुळे हा प्रकार सुरू झाला आहे. प्राचीन काळापासून देशात धान्याच्या अक्षता तयार करून त्या वधू वरांच्या डोक्यावर टाकण्याची ही प्रथा आजही कायम आहे. अन्न हे पोट भरण्याचे साधन आहे.अन्न पायाखाली आल्यास त्याचा अपमान होतो, असे भारतीय संस्कृतीत म्हटले आहे. अन्न वाचविण्याचे प्रयत्न झाले पाहिजे. परंतु लग्न समारंभात मोठ्या प्रमाणात धान्य पायदळी तुडविले जातात.पाखरांना धान्य देण्याकडे कानाडोळावाढत्या उन्हात पक्षांना अन्न मिळणे कठिण होत आहे. यामुळे छतावर घरी असलेल्या झाडावर पाणी आणि अन्न ठेवण्याची गरज आहे.वाया घालणार पण देणार नाहीलग्न समारंभात अक्षतांच्या नावावर धान्य फेकणाऱ्यांकडे जर कुणी धान्य मागण्याकरिता गेले तर त्याला समोर जा, असे सांगून हाकलून लावणारे अनेक महाभाग आहेत. मात्र, विवाहाची वेळ आल्यास धान्याची उधळण करीत प्रतिष्ठा जोपासणारेही कमी नाहीत.फुलांना पसंतीकुणाचे स्वागत करायचे असेल, तर फलांचा वापर करण्यात येतो. फुलाशिवाय स्वागत अशक्यच असल्याचे असते. फुलाशिवाय धार्मिक कार्य होत नाही. लग्नाच्या वेळी नवदाम्पत्याचे स्वागत फुलांच्या माध्यमातून केले तर वावगे काय. वधू वरांच्या डोक्यावर अक्षता फेकण्यापेक्षा त्यांच्यावर पुष्पावर्षाव करण्याचा विचार करणे गरजेचे आहे.