सिंदेवाही : पंचायत समितीने बिरसा मुंडा सिंचन योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना, विशेष केंद्रीय अर्थसहाय योजने अंतर्र्गत सिंदेवाही तालुक्यातील शेकडो लाभार्थी नियमानुसार पात्र ठरविण्यात आले. असे असताना पंचायत समितीचे कृषी अधिकारी माटे यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याने त्रस्त झालेल्या शेकडो लाभार्थ्यांनी आमदार विजय वडेट्टीवार यांना निवेदनासह माहिती दिली. प्रकरण गंभीर दिसताच कृषी अधिकारी माटे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून तातडीने निलंबित करण्यासाठी आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात लाभार्थ्यानी पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे गुरुवारी मोर्चा काढला.शेतकरी योजना, बिरसा मुंडा सिंचन योजना, डॉ. बाबासाहेब स्वावलंबन योजना, विशेष केंद्रीय अर्थसहाय योजना अंतर्गत सिंदेवाही तालुक्यातील पात्र यादी बोलाविल्यानंतर चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या वतीने सदर यादी मंजूर करून ती परत पंचायत समिती सिंदेवाहीकडे पाठविण्यात आले. त्यानुसार पात्र लाभार्थ्यांना तातडीने लाभ मिळण्यासाठी पुढील कार्यवाही पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांना करायची होती. मात्र त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करणे सुरू केले. या योजनेअंतर्गत साहित्य खरेदी करण्याचे अधिकार शेतकऱ्यांना असतानासुध्दा कृषी अधिकारी माटे यांनी शेतकऱ्यांना धमकावून त्यांच्याकडून कोऱ्या चेकवर सह्या घेऊ न स्वत: बँकेतून पैसे विडल केले. माटे यांनी ज्या दुकानातून साहित्य लाभार्थ्याना पाठविले होत, ते सुध्दा बोगस व निकृष्ट दर्जाचे होते. तसेच काही शेतकऱ्यांच्या खात्यातून पैसे विड्राल करूनसुध्दा त्यांचे बिल मंजूर करण्यास टाळाटाळ केली. विहिरीचे अनुदान मंजूर करताना चक्क लाभार्थ्यांकडून पैसे लुटण्यसाचा गोरखधंदा माटे यांनी सुरू केला. या सर्व प्रकारामुळे लाभार्थी असलेले शेतकरी त्रस्त झाले. त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी या गंभीर प्रकरणाची तक्रार सर्वं विकास अधिकारी पंचायत समिती सिंदेवाही यांच्यासाकडे केली. परंतु कोणतीच कार्यवाही होत नसल्यसाने या शेकडो त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी आमदार विजय वडेट्टीवार यांना प्रत्यक्ष भेटून लेखी निवेदन देऊ न सविस्तर माहिती दिली. या गंभीर प्रकरणाबाबत कृषी अधिकारी माटेवर तातडीने कारवाई करून निलंबित करण्याच्या मागणीसाठी आमदार विजय वडेट्टीवार यांनी लाभार्थ्यांच्या उपस्थितीत चक्क पोलीस स्टेशन सिंदेवाहीवर मोर्चा काढला. यावेळी पिडित लाभार्थी शेतकऱ्यांनी ठाणेदाराकडे लेखी तक्रार देऊ न लाभार्थी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याबाबत तातडीने गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली.यावेळी तहसीलदार कुंभरे, इल्लूरवार संवर्ग विकास अधिकारी, रमाकांत लोघे, कविता कुटावार, विरेद्र जैस्वाल, अरूण कोलते, हरी बारेकर, गणेश गोलपल्लीवार, सचिन नाडमवार,स्वप्निल कावळे, रवी सावकुळे, सचिन दडमल, संजय गोबाडे, भूपेश लाखे, रोशन वारजूकर, राकेश कुंटावार, प्रवीण मोगरे यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.
फसवणुकीने संतप्त शेतकऱ्यांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 12:58 AM
पंचायत समितीने बिरसा मुंडा सिंचन योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना, विशेष केंद्रीय अर्थसहाय योजने अंतर्र्गत सिंदेवाही तालुक्यातील शेकडो लाभार्थी नियमानुसार पात्र ठरविण्यात आले.
ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : तत्काळ न्याय द्या