लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येथील आनंदवन चौकातील किरायाच्या घरात नर्सिंग महाविद्यालय उघडण्यात आले. दोन वर्ष नर्सिंग महाविद्यालय व्यवस्थित सुरू होते. महाविद्यालयाच्या संस्थाचालकाने चिमूर प्रकल्प कार्यालयातून तीन लाख ६५ हजार रुपयाची शिष्यवृत्तीची उचल केली. त्यानंतर मात्र महाविद्यालय बंद करण्यात आले. संस्थाचालक सध्या नॉट रिचेबल असल्याने उचल केलेल्या शिष्यवृत्तीच्या वसुलीकरिता आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी हतबल झाले आहेत.मागील काही वर्षात संपूर्ण महाराष्ट्रात अनेक नवीन व नाविन्य पूर्ण अभ्यासक्रम घेऊन महाविद्यालयाचे पीक आले होते. त्यात वरोरा शहरही मागे राहिले नाही. आनंदवन चौकानजिक किरायाच्या घरात प्रियदर्शनी इन्स्टिट्यूट आॅफ नर्सिंग एज्युकेशन या दोन वर्षीय अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आली. काही वर्ष नर्सिंग कॉलेज सुरळित सुरू होते. या महाविद्यालयातील विद्यार्थिनी वरोरा शहरातील आरोग्य शिबिरात आपले योगदानही देत होते. महाविद्यालयावर दिवसागणिक विश्वास वाढत गेला. येथे शिकणाऱ्या विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती मिळत असल्याने त्यांचा कलही वाढला.यामुळे चिमूर येथील आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयाने तीन लाख ६५ हजार रुपयाची शिष्यवृत्ती महाविद्यालयाला विद्यार्थिनींना वाटप करण्याकरिता दिली. त्यानंतर मात्र महाविद्यालय अचानकपणे बेपत्ता झाले. संस्थाचालकाचा पत्ता नसून संचालक मंडळाचे सदस्यही चिमूर कार्यालयाला दिसेनासे झाले आहेत. भ्रमणध्वनी बंद आहे तर काही नॉट रिचेबल असल्याने शिष्यवृत्ती वसुली कशी करावी, असा मोठा प्रश्न ठाकला आहे. महाविद्यालय व संचालक मंडळाच्या सदस्यांना शोधण्याकरिता चिमूर प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी मागावर आहेत.शिष्यवृत्तीच्या वसुलीकरिता नर्सिंग कॉलेज वरोरा येथे पत्र व्यवहार केला. मात्र पत्र परत आल्याने कर्मचाऱ्यांना पाठविण्यात आले. ते ही परत आले. त्यामुळे येत्या काही दिवसात संस्था चालकाविरुद्ध पोलिसात तक्रार करणार आहोत.- हनुमंत तेलंगविस्तार अधिकारी चिमूर.
चंद्रपूर जिल्ह्यात शिष्यवृत्तीची उचल करून संस्थाचालक बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 2:23 PM
येथील आनंदवन चौकातील किरायाच्या घरात नर्सिंग महाविद्यालयाच्या संस्थाचालकाने चिमूर प्रकल्प कार्यालयातून तीन लाख ६५ हजार रुपयाची शिष्यवृत्तीची उचल केली. त्यानंतर मात्र महाविद्यालय बंद करण्यात आले.
ठळक मुद्देवरोऱ्यातील नर्सिंग महाविद्यालयाचा प्रताप तीन लाख ६५ हजार रुपयाची उचल